उमरेड – भिवापूर रोडवर ट्रॅव्हल्सचा अपघात:4 जागीच ठार, 22 प्रवासी जखमी; ट्रॅव्हल्स रेशनच्या उभ्या ट्रकला धडकल्याने झाला अपघात
उमरेड – भिवापूर राष्ट्रीय मार्गावरील तास शिवारात एका भरधाव ट्रॅव्हल्सने उभ्या ट्रकला धडक दिली. यात ट्रॅव्हल्समधील 4 प्रवाशांच्या जागीच मृत्यू झाला, तर 22 प्रवासी गंभीर जखमी झालेत. त्यातील 10 जणांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी नागपूर येथे हलवण्यात आले आहे. गुरुवारी सकाळी साडे 11 च्या सुमारास ही दुर्घटना घडली. यासंबंधीच्या वृत्तानुसार, अपघातग्रस्त ट्रॅव्हल्स (एम.एच. 49 जे. 8616) नागपूर येथून चंद्रपूरच्या भिवापूरकडे जात होती. ती तास शिवारातील बसथांबा परिसरात रस्त्याच्या बाजूला उभ्या असणाऱ्या एका ट्रकला (एम.एच. 31 ए.पी. 2966) धडकली. या ट्रकमध्ये रेशनचे धान्य होते. ट्रकच्या बाजूलाच एक पाणटपरी होती. भरधाव वेगातील ट्रॅव्हल्स हा ट्रक व सदर पाणटपरीला धडकत शेजारच्या शेतात शिरली. या अपघातात ट्रॅव्हल्समधील 1 महिला व एका मुलासह 2 पुरुष असे एकूण 4 जण जागीच ठार झाले. हे सर्वजण ट्रॅव्हल्सच्या खाली दबले गेले होते. या घटनेची माहिती मिळताच, पोलिसांसह स्थानिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. त्यांनी जखमींना भिवापूर येथील ग्रामीण रुग्णालयात हलवले. त्यानंतर जेसीबीच्या मदतीने ट्रॅव्हल्सखाली दबलेले मृतदेह बाहेर काढण्यात आले. जखमींपैकी 10 जणांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी नागपूरला हलवण्यात आले आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, ट्रॅव्हलच्या दर्शनी भागाचा अक्षरश: चुराडा झाला होता. तसेच समोरची दोन्ही चाकेही निखळून पडली होती. मृतांमध्ये भिवापूर व उमरेड येथील प्रत्येकी 1, तर कन्हाळगाव ता. सिंदेवाही, जि. चंद्रपूर येथील एकाचा समावेश आहे. इतर एका प्रवाशाची ओळख पटली नाही. या अपघातामुळे राष्ट्रीय मार्गावरील वाहतूक बराच वेळ विस्कळीत झाली होती.