अनियंत्रित कारने तीन वाहनांना दिली जोराची धडक:ठाकरे नगर भागातील घटना; तरुण ताब्यात, साथीदार फरार

अनियंत्रित कारने तीन वाहनांना दिली जोराची धडक:ठाकरे नगर भागातील घटना; तरुण ताब्यात, साथीदार फरार

एका मद्यपी कारचालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कारने इतर दोन कारसह एका दुचाकीला धडक दिल्याची घटना रविवारी दुपारी पावणे तीन वाजेच्या सुमारास एन.२ ठाकरे नगर भागात घडली. हा अपघात इतका भिषण होता की अपघातात कारने धडक दिलेल्या कार आणि एका दुचाकी पूर्णपणे चेपल्या. अपघात झाल्यावर त्याचा आवाज देखील मोठ्या प्रमाणात झाल्याने या प्रकरणी मद्यपी कार चालकाविरोधात मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अविनाश कांतीलाल शिंदे (२२, रा. गेट नं. ५६ राजनगर, मुकुंदवाडी) असे आरोपीचे नाव आहे. दरम्यान, शनिवारीच निराला बाजार भागात महिलेने दुचाकीस्वाराला उडविल्यानंतर पार्कींगमधील दुचाकींना जोराची धडक दिल्याची घटना घडली होती. दुसऱ्याच दिवशी ही घटना समोर आली असून शहरात हीट ॲन्ड रनच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. आरोपी अविनाश शिंदे हा पूर्वी कार चालक म्हणून काम करित होता. मात्र काही दिवसांपूर्वी त्याचा अपघात झाल्याने त्याने कार चालविणे बंद केले होते. दरम्यानच्या काळात त्याने सेकेंदहॅन्ड स्कोडा कार (क्रं. एमएच-४६-एक्स-४४७२) एका फायनान्स कंपनीकडून खरेदी केली होती. मात्र, ती कार अद्याप त्याच्या नावावर झालेली नाही. रविवारी तो आपल्या चार ते पाच मित्रांना कारमध्ये घेवून फिरत होता. दुपारी २.४० वाजेच्या सुमारास तो मित्रांना घेवून जयभवानी पेट्रोपंपाकडून एन-२ ठाकरे नगरकडे जात होता. मात्र, कार इतक्या वेगात होती की, त्याचे कारवरील नियंत्रण सुटले भरधाव कारने सुरुवातीला रस्त्याच्या उजव्या बाजुला पार्क करून ठेवलेल्या विलास राठोड यांच्या कारला (क्रं. एमएच-०२-बीवाय-७९८८) पाठीमागून जोराची धडक दिली. ही धडक बसताच घाबरलेल्या अविनाशचे कारचे नियंत्रण अधिकच सुटले आणि कार पुन्हा डाव्या साईडकडे वळली. त्याने डाव्या बाजूला उभ्या रुपाली जाधव यांच्या स्कुटीला (क्रं. एमएच-२०-सीएच-११९६) उडविले. त्यानंतर ताराचंद देवराव कोल्हे (६४) यांच्या घरासमोर उभ्या केलेल्या कारला (क्रं. एमएच-२०-सीएच-४३१३) जोराची धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की कार समोरच्या झाडाला धडकून समोर आणि उजव्या बाजुने पूर्णपणे चेपून गेली. या काळात ठाकरे नगर भागात पाणी आले होते आणि नागरिक पाणी भरण्यात व्यस्त होते. मात्र, अपघातामुळे मोठा आवाज झाल्याने परिसरातील लोक भयभित झाले होते. काय झाले हे पाहण्यासाठी ते घराच्या बाहेर आले असता कारने वाहनाला धडक दिल्याचे दिसून आले. सुदैवाने यात कोणतीही जीवीत हानी झाली नाही. तसेच अपघात घडताच आरोपी अविनाश याचे चारही मित्रांनी घटनास्थळावरून धूम ठोकली. मात्र, चालक अविनाश शिंदे नागरिकांच्या तावडीत सापडला. नागरिकांनी फोन करून मुकुंदवाडी पोलिसांना अपघाताची माहिती दिली.

​एका मद्यपी कारचालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कारने इतर दोन कारसह एका दुचाकीला धडक दिल्याची घटना रविवारी दुपारी पावणे तीन वाजेच्या सुमारास एन.२ ठाकरे नगर भागात घडली. हा अपघात इतका भिषण होता की अपघातात कारने धडक दिलेल्या कार आणि एका दुचाकी पूर्णपणे चेपल्या. अपघात झाल्यावर त्याचा आवाज देखील मोठ्या प्रमाणात झाल्याने या प्रकरणी मद्यपी कार चालकाविरोधात मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अविनाश कांतीलाल शिंदे (२२, रा. गेट नं. ५६ राजनगर, मुकुंदवाडी) असे आरोपीचे नाव आहे. दरम्यान, शनिवारीच निराला बाजार भागात महिलेने दुचाकीस्वाराला उडविल्यानंतर पार्कींगमधील दुचाकींना जोराची धडक दिल्याची घटना घडली होती. दुसऱ्याच दिवशी ही घटना समोर आली असून शहरात हीट ॲन्ड रनच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. आरोपी अविनाश शिंदे हा पूर्वी कार चालक म्हणून काम करित होता. मात्र काही दिवसांपूर्वी त्याचा अपघात झाल्याने त्याने कार चालविणे बंद केले होते. दरम्यानच्या काळात त्याने सेकेंदहॅन्ड स्कोडा कार (क्रं. एमएच-४६-एक्स-४४७२) एका फायनान्स कंपनीकडून खरेदी केली होती. मात्र, ती कार अद्याप त्याच्या नावावर झालेली नाही. रविवारी तो आपल्या चार ते पाच मित्रांना कारमध्ये घेवून फिरत होता. दुपारी २.४० वाजेच्या सुमारास तो मित्रांना घेवून जयभवानी पेट्रोपंपाकडून एन-२ ठाकरे नगरकडे जात होता. मात्र, कार इतक्या वेगात होती की, त्याचे कारवरील नियंत्रण सुटले भरधाव कारने सुरुवातीला रस्त्याच्या उजव्या बाजुला पार्क करून ठेवलेल्या विलास राठोड यांच्या कारला (क्रं. एमएच-०२-बीवाय-७९८८) पाठीमागून जोराची धडक दिली. ही धडक बसताच घाबरलेल्या अविनाशचे कारचे नियंत्रण अधिकच सुटले आणि कार पुन्हा डाव्या साईडकडे वळली. त्याने डाव्या बाजूला उभ्या रुपाली जाधव यांच्या स्कुटीला (क्रं. एमएच-२०-सीएच-११९६) उडविले. त्यानंतर ताराचंद देवराव कोल्हे (६४) यांच्या घरासमोर उभ्या केलेल्या कारला (क्रं. एमएच-२०-सीएच-४३१३) जोराची धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की कार समोरच्या झाडाला धडकून समोर आणि उजव्या बाजुने पूर्णपणे चेपून गेली. या काळात ठाकरे नगर भागात पाणी आले होते आणि नागरिक पाणी भरण्यात व्यस्त होते. मात्र, अपघातामुळे मोठा आवाज झाल्याने परिसरातील लोक भयभित झाले होते. काय झाले हे पाहण्यासाठी ते घराच्या बाहेर आले असता कारने वाहनाला धडक दिल्याचे दिसून आले. सुदैवाने यात कोणतीही जीवीत हानी झाली नाही. तसेच अपघात घडताच आरोपी अविनाश याचे चारही मित्रांनी घटनास्थळावरून धूम ठोकली. मात्र, चालक अविनाश शिंदे नागरिकांच्या तावडीत सापडला. नागरिकांनी फोन करून मुकुंदवाडी पोलिसांना अपघाताची माहिती दिली.  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment