एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात महायुतीचे धाडसी निर्णय घेतले:त्यामुळेच राज्यात प्रचंड यश, सत्तेत वाटा मिळावा अशी अपेक्षा चुकीची नाही- शंभूराज देसाई
एकनाथ शिंदेच्य़ा नेतृत्वात महायुती सरकारने धाडसी निर्णय घेतले, त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात महायुतीला प्रचंड यश मिळालेले आहे. त्यामुळे साहजिकच त्या प्रमाणात वाटा मिळावा, त्या प्रमाणात सत्तेत सहभाग असावा, ही अपेक्षा ठेवणे चुकीची नाही, असे शिवसेना नेते शंभुराज देसाई यांनी म्हटले आहे. शंभुराज देसाई पुढे बोलताना म्हणाले की, ठाकरे गटाचे संख्याबळ इतके कमी झाले यांचे कारण संजय राऊत हे आहेत. ह्या राऊतांमुळेच ठाकरे गटाची ही अवस्था झाली. संजय राऊतांच्या हातात आता काहीच उरलेले नाही, असा टोला त्यांनी माध्यमांशी बोलताना लगावला आहे. तर आजचा आणि उद्याचा दिवस वाट बघा समन्वयातून निश्चितपणे अत्यंत सकारात्मक मार्ग निघेल. शंभुराज देसाई म्हणाले की, माननीय संजय राऊतांनी त्यांच्या प्रदीर्घ राजकीय अनुभवाचा आणि विश्वविख्यात प्रवक्ते पदाचा फायदा घेऊन महाविकास आघाडीचा किंवा उबाठाचा विरोधी पक्षनेताही करता येतो का हे बघावे, असा खोचक टोला शंभूराज देसाईंनी संजय राऊत यांना लगावला. संजय राऊतांचे नेमकं वक्तव्य काय? संजय राऊत म्हणाले होते की, महायुतीत 3 पक्ष एकत्र आहेत. त्यांत भाजपला 132 पेक्षा जास्त जागा मिळाल्या आहेत तर एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला 50 हून अधिक तर अजित पवारांच्या पक्षाला 40 हून अधिक उमेदवार निवडून आणले आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळ वाटप कसे करायचे हा त्यांचा प्रश्न आहे. इतकं प्रचंड बहुमत मिळूनसुद्धा मुख्यमंत्री ठरवायला आणि सरकार स्थापन करायला 8 दहा दिवस लागताय. मुख्यमंत्री ठरवायला त्यांना बैठकांवर बैठका घ्याव्या लागतात. पण मुख्यमंत्री ठरला असेल तर आम्ही त्याचे स्वागत करु शेवटी राज्याचा मुख्यमंत्री आहे.