‘रॅडिको’ची अक्षम्य चूक:बचावकार्यातील जेसीबीनेच घेतला चार कामगारांचा बळी, मक्याच्या ढिगाऱ्याखाली कामगारांचा मृत्यू
शेंद्रा येथील रॅडिको एन. व्ही. कंपनीच्या धान्याचे कोठार (सायलो) फुटून चौघांचा मृत्यू झाल्याच्या घटनेत चौथ्या दिवशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. हे चार मृत्यू मक्याच्या ढिगाऱ्याखाली झाल्याची कंपनीची तक्रार होती. मात्र तसे नसून प्रत्यक्षात बचावकार्यातील जेसीबी, पोकलेनने त्यांचा बळी घेतल्याचे ‘दिव्य मराठी’ इन्व्हेस्टिगेशनमधून उघडकीस आाले आहे. अतिरक्तस्रावातून मृत्यू झाल्याचे प्राथमिक शवविच्छेदन अहवालात नमूद आहे. विशेष म्हणजे संतोष पोपळघट (३०) आणि विजय गवळीचा (४५) मृत्यू जेसीबीच्या फटक्यामुळेच झाला. मक्याच्या ढिगाऱ्यात इतर चौघे जिवंत होते म्हणून त्यांचे प्राण वाचले. त्यामुळे कामगारांचा गुदमरून मृत्यू झाल्याचा कंपनीचा दावा फोल ठरला आहे. मद्यनिर्मितीचा कच्चा माल बनवणाऱ्या ‘रॅडिको’तील १५ नोव्हेंबरची ही घटना आहे. वेल्डर्स वेल्डिंग करत होते. मात्र लोखंडी कोठार फुटले. मग ३.५० लाख किलो मक्याच्या ढिगाऱ्यात कामगार दबले. त्यांना काढण्यासाठी प्रशिक्षित कर्मचाऱ्यांमार्फतच बचावकार्य करणे अनिवार्य होते. कंपनीने सरधोपट जेसीबी, पोकलेन आणले. त्या ऑपरेटर्सनी अक्षरश: जमिनीतून दगड फोडून काढावेत अशा पद्धतीने कार्य केले. कंपनीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत गुदमरून मृत्यूचा केला दावा
जेसीबीमुळे संतोषचा एक हात, एक पाय तुटून मक्याच्या ढिगाऱ्यात पडला होता. अतिरक्तस्राव आणि सर्वांगावर उर्वरित संतोषला शंभर रुपये पगारवाढीचे अामिष दिले होते. काम सोडायचे असताना कॉन्ट्रॅक्टर रिठे त्याला सोडत नव्हते. नियम ८ तास कामाचे आहेत. पण १२ ते १४ तास काम करून घेतले. ओव्हरटाइमचे पैसे देत नव्हते. संतोषचा पाय, हात आम्ही शोधला. गुदमरल्याने शरीराचे तुकडे होत नाहीण. अशोक पोपळघट, मृत संतोषचा भाऊ जखमा असल्याचाही अहवालात उल्लेख आहे. विजयचा मृत्यूही कठीण वस्तूने झाल्याचे स्पष्ट झाले. डोके फुटले. स्पाइनलाही गंभीर दुखापत झाली. कंपनीच्या (१७ नोव्हेंबर) करमाड पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत चौघांचा मृत्यू मक्याच्या ढिगाऱ्यात गुदमरल्याने झाल्याचा दावा केला. मात्र गुदमुरून मृत्यू झाल्याचा साधा उल्लेखही केलेला नाही. इतर चार जणांचा मक्याच्या ढिगाऱ्याखालीही श्वास सुरू होता कंपनीतील इतर कामगार मक्याच्या ढिगाऱ्याखाली होते. तरीही त्यांचे प्राण वाचले. कारण त्यांना जेसीबीचा धक्का बसला नाही. वाल्मीक शेळके (३८), प्रकाश काकड (३६), संदीप घोडगे (४७) आणि प्रशांत सोनवणे (२३) यांचा त्यात समावेश आहे. ट्रक ड्रायव्हर गणेश दाभाडे ट्रकसह मक्याच्या ढिगाऱ्याखाली होता. घटनेच्या दिवशी त्यांनी ‘दिव्य मराठी’ला आपबीती सांगितली होती. 1 विजय गवळीच्या मेंदू, स्पाइनला दुखापत
विजय मोबाइलवर व्हिडिओ करत होते. त्याच वेळी त्यांच्या अंगावर मका पडला. ते ढिगाऱ्यात सर्वात शेवटी होते. जेसीबीमुळे मेंदू आणि स्पाइनला गंभीर दुखापत झाली. 2 संतोषचा हात, पाय झाला धडावेगळा
संतोष क्रेनच्या बकेटमध्ये बसून वेल्डिंग करत होता. मका पडताना बकेट बाजूला घेण्याचा प्रयत्न केला. संपूर्ण सायलो फुटून दबला. जेसीबीने एक हात-पाय तुटला. 3 किशन हिरडेंच्या सर्वांगावर जखमा
किशन हिरडेही तिथेच होते. ते दबून गेल्याचे इतरांनी पाहिले. पण बचाव कार्यातील ऑपरेटरला कळलेच नाही. जेसीबीमुळे त्यांच्या सर्वांगावर जखमा असल्याचे नमूद आहे. 4 दत्तात्रय बोधारेंनाही अतिरक्तस्राव
दत्तात्रय यांच्या पोट, छातीवर खूप जखमा होत्या. त्यांनाही जेसीबीच्या फावड्यामुळे झालेल्या जखमातून प्रचंड रक्तस्राव झाल्याने ते गतप्राण झाल्याची शक्यता आहे.