नाशिक: चांदवड तालुक्यातील हरनूल येथील भारतीय सैन्य दलातील जवान श्रीनगर येथे कार्यरत होते कुस्तीचा सराव सुरु असताना त्यांचे दुर्दैवी निधन झाले आहे. वयाच्या २५ वर्षीय जवान विक्की अरूण चव्हाण यांच्या निधनाने चव्हाण कुटुंबासह संपूर्ण हरनूल गावावर शोककळा पसरली आहे. जवान विक्की अरूण चव्हाण श्रीनगर येथील पुंछ राजोरी येथे महार रेजिमेंट मध्ये कार्यरत होते. ते स्वतः कुस्तीपटू असल्याने अनेक स्पर्धांच्या निमित्ताने सराव करत असायचे. काल सायंकाळी कुस्तीचा सराव सुरु असताना त्यांना वीरमरण आले.
लडाखमधील आर्मीच्या ट्रक अपघातात ९ जवानांनी प्राण गमावले, साताऱ्याच्या वैभव भोईटेंना वीरमरण, राजाळे शोकाकूल
विक्की चव्हाण हे गेल्या साडे चार वर्षांपासून भारतीय सैन्यदलात कार्यरत होते. श्रीनगर येथील पुंछ राजोरी येथे महार रेजिमेंट मध्ये कार्यरत होते. पहिल्यापासून कुस्तीची आवड असल्याने ते भारतीय सैन्य दलाकडून देखील कुस्ती खेळत असत. याच माध्यमातून चव्हाण यांची राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत निवड झाली होती. पुढील महिनाभरात ही स्पर्धा होणार होती. त्यामुळे चव्हाण यांची जोरदार तयारी सुरु होती. नेहमीप्रमाणे काल सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास कुस्तीचा सराव सुरु असताना अपघात झाला. यात चव्हाण यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

अवघ्या ३ सेकंदांचा अपघात, मुलगा ब्रेन डेड; कुटुंबाचा एक निर्णय देणार ७ जणांना जीवनदान

विक्की चव्हाण यांच्या निधनाची वार्ता चांदवड येथे त्यांच्या कुटुंबीयांना समजल्या नंतर चव्हाण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांच्या ह्या दुर्दैवी निधनाने हरनूल गावासह संपुर्ण चांदवड तालुक्यावर शोककळा पसरली आहे. विक्की चव्हाण हे महिनाभरापूर्वीच सुट्टीनिमित्त गावाकडे येऊन गेल्याचे कुटुंबियांनी सांगितले. चव्हाण यांना कुस्तीची आवड असल्याने ते राष्ट्रीय स्तरावर पोहचले होते. याच स्पर्धेच्या निमित्ताने सराव सुरु असताना त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *