केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंवर गुन्हा दाखल करण्याची पँथर सेनेची मागणी:मुक्ताईनगर येथे जनउठाव आक्रोश मोर्चा; तहसीलदारांना दिले निवेदन

केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंवर गुन्हा दाखल करण्याची पँथर सेनेची मागणी:मुक्ताईनगर येथे जनउठाव आक्रोश मोर्चा; तहसीलदारांना दिले निवेदन

येथील गटविकास अधिकाऱ्यांना अपमानास्पद वागणूक दिल्याबद्दल केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याविरुद्ध अॅट्रॉसटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसह अन्य काही मागण्यांसाठी मुक्ताईनगर येथे ऑल इंडिया पँथर सेनेचा जनउठाव आक्रोश मोर्चा काढण्यात आला. याबाबत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. निवेदनात मुक्ताईनगर गटविकास अधिकारी निशा जाधव यांना न्याय मिळावा, केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करावा, माता रमाई आवास योजनेचा लाभ वाढवून मिळावा, आदी मागण्या केल्या. निवेदन देतांना ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार, युवा जिल्हाध्यक्ष लखन पानपाटील, जिल्हा संघटक बंटी गुरचळ, जिल्हा उपाध्यक्ष रोहन मेढे, तालुकाध्यक्ष अमर यमनेरे, युवा तालुकाध्यक्ष सम्राट बोदडे व कार्यकर्ते उपस्थित होते.

​येथील गटविकास अधिकाऱ्यांना अपमानास्पद वागणूक दिल्याबद्दल केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याविरुद्ध अॅट्रॉसटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसह अन्य काही मागण्यांसाठी मुक्ताईनगर येथे ऑल इंडिया पँथर सेनेचा जनउठाव आक्रोश मोर्चा काढण्यात आला. याबाबत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. निवेदनात मुक्ताईनगर गटविकास अधिकारी निशा जाधव यांना न्याय मिळावा, केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करावा, माता रमाई आवास योजनेचा लाभ वाढवून मिळावा, आदी मागण्या केल्या. निवेदन देतांना ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार, युवा जिल्हाध्यक्ष लखन पानपाटील, जिल्हा संघटक बंटी गुरचळ, जिल्हा उपाध्यक्ष रोहन मेढे, तालुकाध्यक्ष अमर यमनेरे, युवा तालुकाध्यक्ष सम्राट बोदडे व कार्यकर्ते उपस्थित होते.  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment