जयपूर : भाजपचे केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या आमदाराला निलंबित केलं आहे. राजस्थानमधील भाजपचे शाहपुरा मतदारसंघाचे आमदार कैलाश मेघवाल यांचं पक्षाचं प्राथमिक सदस्यत्व निलंबित करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे कैलाश मेघवाल राजस्थानच्या विधानसभेचे अध्यक्ष राहिलेले आहेत. कैलाश मेघवाल यांनी जयपूरमध्ये पत्रकार परिषद घेत पक्षानं दिलेलं नोटीस सार्वजनिक केलं आहेत.

कैलाश मेघवाल यांनी भाजपनं मला निलंबित केलेलं आहे. मी निवडणूक लढवणार असून भाजपच्या उमेदवाराचा हजारो मतांनी पराभव करणार असल्याचं म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना सविस्तर पत्र लिहिलं असल्याचं ते म्हणाले.

कायदा मंत्री अर्जुन मेघवाल यांच्यावर कैलाश मेघवाल यांनी टीका केली. ते म्हणाले की, “अर्जुन मेघवाल यांच्यासारखा भ्रष्ट व्यक्त देशाचा कायदा मंत्री कसा असू शकतो”. राजस्थानमध्ये पक्ष दोन गटात विभागला गेलेला आहे. वसुंधराराजे यांच्या गटाला पूर्णपणे संपवण्याचा कट केला जात असल्याचं ते म्हणाले.

कैलाश मेघवाल यांनी वसुंधराराजे यांच्या समर्थकांना एक एख करुन बाहेर काढलं जात आहे. मला देखील त्यांच्या गटातील असल्याचं मानलं जातं. मी माझी भूमिका मांडली आहे. सीपी जोशी, राजेंद्र राठोड आणि सतीश पुनिया गटबाजी करत आहेत, असा आरोप मेघवाल यांनी केला. कोण गटबाजी करत आहे, याबाबत पंतप्रधानांना सविस्तर कळवलं आहे, असंही ते म्हणाले.
ऐतिहासिक वास्तू जपण्यासाठी गावकऱ्यांची अनोखी शक्कल, महाराष्ट्रात केवळ ‘या’ गावाची चर्चा

भाजपमध्ये आयारामांचा बोलबाला आहे, सीपी जोशी हे एनएसयूआयमधून आलेले आहेत. राजेंद्र राठोड जनता पार्टीतून आलेत. दोन्ही नेत्यांना भाजपच्या विचारधारेबद्दल माहिती नाही. ते लोक सोयीचं राजकारण करण्यासाठी आल्याचा आरोप कैलाश मेघवाल यांनी केला.

पाकिस्तानच्या फायनलचा फैसला ५० नाही तर २० षटकांतच होणार, जाणून घ्या सुपर समीकरण

सी.पी. जोशी जुने काँग्रेसी आहेत. त्यामुळं ते मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या कामाची प्रशंसा करतात. त्यांचे सर्वपक्षीयांशी संबंध आहेत, असं कैलाश मेघवाल म्हणाले. दरम्यान, एकेकाळी पक्षामध्ये मी हिरो होतो पण आता शुन्यावर आलो असल्याचं कैलाश मेघवाल म्हणाले. भाजपकडून अर्जुन राम मेघवाल यांना प्राधान्य दिलं जात असल्याचं देखील ते म्हणाले.

Manoj Jarange: ‘इतकी फेकाफेकी पाहिली नाही.. पण मुख्यमंत्री येतील’, ती बातमी कळताच मनोज जरांगे असं का म्हणाले?

मुख्यमंत्र्यांचा निर्णय चुकीचा, पश्चिम महाराष्ट्रातील मराठ्यांनी काय घोडं मारलंय; पृथ्वीराज चव्हाणांचा संताप



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *