मोदी-शहा निवडणूक होईपर्यंत देशाची राजधानीच राज्यात हलवतील:सरकार बैल पुत्र असल्याचे म्हणत संजय राऊतांचा हल्लाबोल

मोदी-शहा निवडणूक होईपर्यंत देशाची राजधानीच राज्यात हलवतील:सरकार बैल पुत्र असल्याचे म्हणत संजय राऊतांचा हल्लाबोल

देशाचे गृहमंत्री हे वार्डा- वार्डामध्ये बैठका घेत आहेत. ते राज्यात आले की महाराष्ट्राच्या लुटीविषयी निर्णय होतात. त्यामुळे देशाचे गृहमंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात आल्यावर भीती वाटते, अशा शब्दात उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. महाराष्ट्रातील निवडणूक होईपर्यंत मोदी आणि शहा हे देशाची राजधानी महाराष्ट्रात हलवू शकतात, अशा शब्दात त्यांनी अमित शहा यांच्यावर निशाणा साधला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येतात तेव्हा पूर्ण गृहमंत्रालय महाराष्ट्रात येते. पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येतात, तेव्हा पूर्ण पीएमओ महाराष्ट्रात येते. त्यामुळे वारंवार विमानाचे इंधन जाळल्यापेक्षा निवडणुका होईपर्यंत ते देशाची राजधानीच महाराष्ट्रात हलवतील, अशी शक्यता असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. मोदी राज्यात आले की भीती वाटते. त्यांच्या दौऱ्यामध्ये राज्याच्या लुटी संदर्भातला निर्णय होतो, अशा शब्दात संजय राऊत यांनी अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यावर टीका केली. राज्यातील सरकार बैल पुत्र – आधीच्या गाईच्या दुधाला भाव द्या राज्यात सध्याचे सरकार हे बैल पुत्र आहेत. त्यांचे बाप बैल आहेत. अशा खोचक शब्दात त्यांनी राज्य सरकारच्या निर्णयावर टीका केली. गाईला राज्यमाता केल्यापेक्षा गाईच्या दुधाला भाव द्या, अशी मागणी त्यांनी केली. दिल्लीतून काही बैल येतात, केंद्रातले बैल राज्यात फिरत असतात. त्यानंतर आमच्या महाराष्ट्रातील बैल देखील असे निर्णय घेतात, अशा शब्दात संजय राऊत यांनी राज्य सरकारवर देखील टीका केली. गाईची पूजा आम्ही सर्वच करतो. त्यासाठी शासकीय आदेश काढण्याची गरज नसल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. आधी सावकरांचे पुस्तक वाचा हिंदुहृयदसम्राट वीर सावरकर यांचे राज्य माते संदर्भातले विचार माहिती आहेत का? आधी सावरकर यांचे पुस्तक वाचा, असे आवाहन देखील त्यांनी केले. सावरकर यांनी गोमाते बद्दल जे मत स्पष्ट केले, ते जर भाजपला मान्य नसेल तर त्यांनी सावरकरांचे नाव घेऊ नये, अशी टीका देखील राऊत यांनी केली. आणि जर त्यांचे विचार मान्य असेल तर आमच्या गोमातेविषयी बालू नये, असे आवाहन देखील राऊत यांनी केले आहे. महाराष्ट्र अदानी-लोढ्यांच्या घश्यात घालण्याचा डाव महाराष्ट्रासाठी ज्या 106 हुतात्म्यांनी जीव दिला. आपला बळी देऊन महाराष्ट्र मिळवला. त्या हुतात्म्याच्या यादीत अदानींचे नाव नाही. या महाराष्ट्रासाठी आमचे पूर्वज लढले आहेत. त्या महाराष्ट्राची जमीन अदानींच्या आणि लोढांच्या घशात घातली जात असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. मुंबई ही मराठी माणसांची आहे. ती तुम्ही गुजराती माणसांच्या घशाच घालत असल्याचा आरोप त्यांनी केला. हा 106 हुतात्म्यांचा अपमान असल्याचा देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे. या विरोधात आता संयुक्त महाराष्ट्र सारखे आंदोलन उभे राहिला हवे, ही आमची भूमिका असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले. राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा… राष्ट्रवादी पक्ष कोणाचा? यावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी:शरद पवार गटाने विधानसभा निवडणुकीपूर्वी निर्णय घेण्याचे केले होते आवाहन खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत अजित पवार गट आणि शरद पवार गटात सुरू असलेल्या खटल्याची आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. 25 सप्टेंबर रोजी झालेल्या सुनावणीत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वकिलांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी हे प्रकरण निकाली काढण्याचे आवाहन केले होते. यानंतर न्यायमूर्ती सूर्यकांत, दीपंकर दत्ता आणि उज्वल भुईया यांच्या न्यायापीठाने या प्रकरणाची सुनावणी 1 ऑक्टोबरला निश्चित केली होती. पूर्ण बातमी वाचा…. मविआतील जागावाटपाबाबत सोमवारी 7 तास चर्चा:आज पुन्हा आघाडीची बैठक होण्याची शक्यता; जयंत पाटील यांचे संकेत महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष रणनीती आखण्यात व्यस्त आहेत. महाविकास आघाडी आघाडीत असलेल्या प्रमुख पक्षांची सोमवारी जागावाटपाबाबत बैठक झाली. या बैठकीनंतर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, जागावाटपावर चर्चा झाली आहे, मात्र त्यावर आणखी चर्चा होण्याची गरज आहे. मंगळवारी पुन्हा आघाडीची बैठक होण्याची शक्यता आहे. पूर्ण बातमी वाचा.. राज्याचा पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचाच असेल:काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांचे मोठे वक्तव्य महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीत लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाची पुनरावृत्ती पक्ष करेल आणि राज्याचा पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचाच असेल, असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. 288 सदस्यीय विधानसभेत विरोधी महाविकास आघाडी 180 हून अधिक जागा जिंकून सरकार स्थापन करेल, असा विश्वासही चव्हाण यांनी व्यक्त केला. पूर्ण बातमी वाचा…

​देशाचे गृहमंत्री हे वार्डा- वार्डामध्ये बैठका घेत आहेत. ते राज्यात आले की महाराष्ट्राच्या लुटीविषयी निर्णय होतात. त्यामुळे देशाचे गृहमंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात आल्यावर भीती वाटते, अशा शब्दात उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. महाराष्ट्रातील निवडणूक होईपर्यंत मोदी आणि शहा हे देशाची राजधानी महाराष्ट्रात हलवू शकतात, अशा शब्दात त्यांनी अमित शहा यांच्यावर निशाणा साधला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येतात तेव्हा पूर्ण गृहमंत्रालय महाराष्ट्रात येते. पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येतात, तेव्हा पूर्ण पीएमओ महाराष्ट्रात येते. त्यामुळे वारंवार विमानाचे इंधन जाळल्यापेक्षा निवडणुका होईपर्यंत ते देशाची राजधानीच महाराष्ट्रात हलवतील, अशी शक्यता असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. मोदी राज्यात आले की भीती वाटते. त्यांच्या दौऱ्यामध्ये राज्याच्या लुटी संदर्भातला निर्णय होतो, अशा शब्दात संजय राऊत यांनी अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यावर टीका केली. राज्यातील सरकार बैल पुत्र – आधीच्या गाईच्या दुधाला भाव द्या राज्यात सध्याचे सरकार हे बैल पुत्र आहेत. त्यांचे बाप बैल आहेत. अशा खोचक शब्दात त्यांनी राज्य सरकारच्या निर्णयावर टीका केली. गाईला राज्यमाता केल्यापेक्षा गाईच्या दुधाला भाव द्या, अशी मागणी त्यांनी केली. दिल्लीतून काही बैल येतात, केंद्रातले बैल राज्यात फिरत असतात. त्यानंतर आमच्या महाराष्ट्रातील बैल देखील असे निर्णय घेतात, अशा शब्दात संजय राऊत यांनी राज्य सरकारवर देखील टीका केली. गाईची पूजा आम्ही सर्वच करतो. त्यासाठी शासकीय आदेश काढण्याची गरज नसल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. आधी सावकरांचे पुस्तक वाचा हिंदुहृयदसम्राट वीर सावरकर यांचे राज्य माते संदर्भातले विचार माहिती आहेत का? आधी सावरकर यांचे पुस्तक वाचा, असे आवाहन देखील त्यांनी केले. सावरकर यांनी गोमाते बद्दल जे मत स्पष्ट केले, ते जर भाजपला मान्य नसेल तर त्यांनी सावरकरांचे नाव घेऊ नये, अशी टीका देखील राऊत यांनी केली. आणि जर त्यांचे विचार मान्य असेल तर आमच्या गोमातेविषयी बालू नये, असे आवाहन देखील राऊत यांनी केले आहे. महाराष्ट्र अदानी-लोढ्यांच्या घश्यात घालण्याचा डाव महाराष्ट्रासाठी ज्या 106 हुतात्म्यांनी जीव दिला. आपला बळी देऊन महाराष्ट्र मिळवला. त्या हुतात्म्याच्या यादीत अदानींचे नाव नाही. या महाराष्ट्रासाठी आमचे पूर्वज लढले आहेत. त्या महाराष्ट्राची जमीन अदानींच्या आणि लोढांच्या घशात घातली जात असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. मुंबई ही मराठी माणसांची आहे. ती तुम्ही गुजराती माणसांच्या घशाच घालत असल्याचा आरोप त्यांनी केला. हा 106 हुतात्म्यांचा अपमान असल्याचा देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे. या विरोधात आता संयुक्त महाराष्ट्र सारखे आंदोलन उभे राहिला हवे, ही आमची भूमिका असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले. राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा… राष्ट्रवादी पक्ष कोणाचा? यावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी:शरद पवार गटाने विधानसभा निवडणुकीपूर्वी निर्णय घेण्याचे केले होते आवाहन खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत अजित पवार गट आणि शरद पवार गटात सुरू असलेल्या खटल्याची आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. 25 सप्टेंबर रोजी झालेल्या सुनावणीत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वकिलांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी हे प्रकरण निकाली काढण्याचे आवाहन केले होते. यानंतर न्यायमूर्ती सूर्यकांत, दीपंकर दत्ता आणि उज्वल भुईया यांच्या न्यायापीठाने या प्रकरणाची सुनावणी 1 ऑक्टोबरला निश्चित केली होती. पूर्ण बातमी वाचा…. मविआतील जागावाटपाबाबत सोमवारी 7 तास चर्चा:आज पुन्हा आघाडीची बैठक होण्याची शक्यता; जयंत पाटील यांचे संकेत महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष रणनीती आखण्यात व्यस्त आहेत. महाविकास आघाडी आघाडीत असलेल्या प्रमुख पक्षांची सोमवारी जागावाटपाबाबत बैठक झाली. या बैठकीनंतर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, जागावाटपावर चर्चा झाली आहे, मात्र त्यावर आणखी चर्चा होण्याची गरज आहे. मंगळवारी पुन्हा आघाडीची बैठक होण्याची शक्यता आहे. पूर्ण बातमी वाचा.. राज्याचा पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचाच असेल:काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांचे मोठे वक्तव्य महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीत लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाची पुनरावृत्ती पक्ष करेल आणि राज्याचा पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचाच असेल, असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. 288 सदस्यीय विधानसभेत विरोधी महाविकास आघाडी 180 हून अधिक जागा जिंकून सरकार स्थापन करेल, असा विश्वासही चव्हाण यांनी व्यक्त केला. पूर्ण बातमी वाचा…  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment