नवी दिल्ली: How To Block Unwanted Calls:प्रत्येक स्मार्टफोन युजरला कधी तरी अनवॉन्टेड कॉल येतातच.ज्याचा अर्थातच युजर्सना त्रास होतो. आणि जर महत्वाच्या कामांमध्ये असताना असे कॉल्स आले. तर, वैताग येणे साहजिक आहे तुम्हीही या अनवॉन्टेड कॉल्सना वैतागला असाल तर, आता काळजी करण्याची गरज नाही. काही टिप्सच्या तुमच्या फोनवरील असे सर्व कॉल्स बंद करता येतात. आज आम्ही यासाठी काही मार्ग सांगणार आहोत, जे तुम्हाला अशा कॉल्सपासून दूर ठेवतील.

वाचा: Amazon Sale: ग्राहकांची मजा, ‘या’ कंपनीच्या बजेट स्मार्टफोन्सवर फ्री मिळताहेत इयरफोन्स

Do Not Disturb मोड :

२०१५ मध्ये अँड्रॉइड मार्शमॅलो रिलीज झाल्यापासून जवळपास प्रत्येक फोनमध्ये ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. Do Not Disturb मोड “सायलेंट” मोडप्रमाणे काम करतो. याचा वापर करून, तुम्हाला हवे तेव्हा ते चालू करून तुम्ही Unwanted Calls पासून फ्री होऊ शकता.

वाचा: सरकारने दिला इशारा, हॅकिंगपासून सुरक्षित राहायचे असेल तर या गोष्टींकडे दुर्लक्ष करुच नका

कॉल बॅरिंग पद्धत:

हे वैशिष्ट्य तुमच्याकडील सर्व इनकमिंग आणि आउटगोइंग कॉल्सवर नियंत्रण ठेवते. तुम्ही इनकमिंग कॉल्सवर कॉल बॅरिंग सेट केले असल्यास, ते तुमच्या फोनवरून येणारे कोणतेही कॉल थांबवते. तुम्ही आउटगोइंग कॉलवरही याचा वापर करू शकता. कॉल बॅरिंग चालू करण्यासाठी, तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. सर्वप्रथम तुमची फोन सेटिंग्ज उघडा आणि कॉलस्टेपवर टॅप करा. त्यानंतर कॉल सेटिंग्जमधील कॉल बॅरिंग स्टेप्सवर टॅप करा. आता All Incoming वर टॅप करा. येथे तुम्हाला १२३४ किंवा ०००० असा पासवर्ड द्यावा लागेल. त्यानंतर टर्न ऑन वर टॅप करा आणि हे फीचर चालू होईल.

थर्ड पार्टी अॅप:

याशिवाय, तुम्ही थर्ड-पार्टी कॉल ब्लॉकिंग अॅप्सवरून तुमच्या नंबरवर कॉल ब्लॉक करू शकता. कॉल ब्लॉकर अॅप तुम्हाला संशयास्पद नंबर ओळखण्यास, ब्लॉक करण्यास आणि तक्रार करण्यास मदत करते.

वाचा: Online Shopping करताना राहा एक्स्ट्रा अलर्ट, अन्यथा पैसे पोहोचतील हॅकर्सकडे, पाहा सेफ्टी टिप्सSource link

Leave a Reply

Your email address will not be published.