मुंबई: अभिनेत्री उर्वशी रौतेलाचा (Urvashi Rautela Viral Video) एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती एका कॉलेज फेस्टमध्ये सहभागी झाली आहे. मात्र तिला याठिकाणी विचित्र अनुभव आला आहे. अभिनेत्रीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विद्यार्थ्यांच्या या ओरडण्यावर अभिनेत्री उर्वशी रौतेला फार प्रतिसाद देत नाही, पण तिच्या या व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा मात्र होत आहे. high.br0 या इन्स्टाग्राम पेजवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओ काही युजर्सनी कमेंट करत हा व्हिडिओ देहरादूनमधील कॉलेजचा आहे असं म्हटलं आहे.

या व्हायरल व्हिडिओमध्ये उर्वशी रौतेला गुलाबी रंगाच्या आउटफिटमध्ये आहे. आजूबाजूला विद्यार्थ्यांची गर्दी असताना बॉडीगार्ड्सच्या मदतीने ती याठिकाणी वाट काढत असते. यावेळी ती पुढे सरकत असतानाच विद्यार्थ्यांनी ‘ऋषभ ऋषभ’ ओरडायला सुरुवात केली आहे.

हे वाचा-‘मी कपडे फाडेन’ जेव्हा शाहरुखने तिच्यासाठी केलेलं मोठं वक्तव्य

२०१८ साली उर्वशी रौतेला आणि ऋषभ पंत डेट करत असल्याच्या (Urvashi Rautela and Rishabh Pant Dating Rumors) चर्चा होत्या. त्या दोघांना अनेकदा एकत्र देखील स्पॉट करण्यात देखील आले होते. अभिनेत्री आयपीएलमध्ये ऋषभ पंतसाठी चिअर करताना देखील पाहायला मिळाली होती. पण त्यांनी कधी त्यांचे नाते जाहीरपणे कबुल केले नव्हते. असं होण्यापूर्वीच त्यांचा ब्रेकअप झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. आता उर्वशी कॉलेजमध्ये कार्यक्रमासाठी पोहोचल्यानंतर तिचे अशाप्रकारे स्वागत झाले, त्यामुळे अजूनही ऋषभ-उर्वशीचे रिलेशनशिप त्यांचे चाहते विसरले नाहीत हे स्पष्ट होते आहे.

उर्वशी-ऋषभच्या ब्रेकअपनंतर अशीही बातमी समोर आली होती की या दोघांनीही एकमेकांना WhatsApp वर देखील ब्लॉक केले आहे. ऋषभ सध्या (Rishabh Pant Girlfriend) इशा नेगीसह रिलेशनशिपमध्ये आहे. त्याने इन्स्टाग्रामवर त्यांचे नाते मान्य देखील केले आहे. त्याने गर्लफ्रेंड इशा नेगी हिच्यासह रोमँटिक फोटो शेअर करत म्हटले होते की, ‘मला केवळ तुला आनंदी ठेवायचे आहे कारण मी आनंदी असण्याचं कारण तू आहेस’. इशाने देखील ऋषभसाठी रोमँटिक पोस्ट केली आहे.

हे वाचा-…अन् पुन्हा चर्चेत आली दिशा पाटनीसह आदित्य ठाकरेंची ती डिनर डेट

सध्या ऋषभ पंत दक्षिण आफ्रिकेविरोधात टी-२० सीरिजमध्ये भारतीय संघाचा कर्णधार आहे. टी-२० सीरिजमध्ये भारताला दोन सामने गमवावे लागले आहेत. दिल्ली टी-२० मध्ये भारताला दक्षिण आफ्रिकेने ७ विकेटने हरवले तर कटक टी-२० मध्ये भारताचा ४ विकेटने पराभव झाला आहे. उर्वशी रौतलाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिने अलीकडेच कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२२ च्या रेड कार्पेटवर धमाकेदार एंट्री केली होती.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.