मुंबई- अभिनेत्री उर्वशी रौतेला ला चर्चेत कसं राहायचं हे काही वेगळं सांगायची गरज नसते. कधी ती ग्लॅमर आणि स्टाईल स्टेटमेंटमुळे चर्चेत असते तर कधी ऋषभ पंतमुळे. विशेष म्हणजे गेल्या दोन दिवसापासून ती तिच्या कामामुळे चर्चेत आली आहे. सुपरस्टार चिरंजीवी यांचा ‘वॉल्टेयर वीरैया’ सिनेमाची तुफान चर्चा आहे. उर्वशीने या सिनेमात ३ मिनिटांचं आयमट साँगही केलं आहे. पण या ३ मिनिटांसाठी तिने चक्क २ कोटी रुपयांचं मानधन घेतल्याचं म्हटलं जात आहे. ‘बॉस पार्टी’ आयटम साँगसाठी तिने एवढं मानधन आकारलं आहे.

३ मिनिटांसाठी २ कोटी

उर्वशी फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर कन्नड आणि तमिळ सिनेमांमध्येही काम करते. उर्वशीने गेल्याच वर्षी तमिळ सिनेसृष्टीत पदार्पणाची घोषणा केली होती. ती जेडी जेरीच्या ‘द लीजेंड’ सिनेमात दिसणार आहे. दुसरीकडे, ‘बॉस पार्टी’च्या मानधनाबद्दल बोलायचं तर, उर्वशीने या आयटम साँगसाठी जवळपास २ कोटी रुपये एवढी मोठी रक्कम घेतली आहे. विशेष म्हणजे उर्वशीने या गाण्यासाठी जेवढी रक्कम घेतली आहे ती रक्कम सिनेमात खलनायकाची भूमिका साकारणाऱ्या प्रकाश राज यांच्या मानधनापेक्षा जास्त आहे. या सिनेमासाठी प्रकाश राज यांनी दीड कोटी रुपये मानधन घेतलं आहे.


उर्वशी रौतेलाचे आगामी सिनेमे

चिरंजीवी स्टारर या सिनेमाने अवघ्या १० दिवसांत जगभरात २०० कोटींचा गल्ला जमवला आहे. विशेष म्हणजे उर्वशीच्या या आयटम नंबरची क्रेझ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. अभिनेत्रीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर उर्वशी लवकरच ‘ऐ दिल है ग्रे’ सिनेमात दिसणार आहे. दरम्यान, उर्वशीने काही हिंदी सिनेमेही केले. अनिल शर्मा यांच्या अॅक्शन आणि रोमँटिकपट ‘सिंह साब द ग्रेट’मधून तिने आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *