वॉशिंग्टन : महागाई नियंत्रणात आणण्यात अपेक्षित यश न मिळाल्याने अमेरिकेची केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्हने पुन्हा एकदा व्याजदरात ०.७५ टक्के वाढ जाहीर केली आहे. सलग तिसऱ्या वाढीनंतर बँकेचा बेंचमार्क फंड रेट ३% वरून ३.२५% पर्यंत वाढला आहे. २००८ च्या सुरुवातीपासूनचा हा सर्वाधिक व्याजदर आहे. याशिवाय २०२३ पर्यंत व्याजदर ४.६ टक्क्यांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. अमेरिकन मध्यवर्ती बँकेच्या व्याजदरवाढीच्या निर्णयाची झळ भारतासह संपूर्ण जगाला बसणार आहे. या निर्णयामुळे अमेरिकन शेअर बाजार डाऊ जोन्स २२० पेक्षा अधिक अंकांनी घसरला, आणि ३०,५०० अंकांवर आला.

US फेड देणार आनंदाची बातमी? अमेरिकेतील वाढत्या व्याजदराचा भारतीयांच्या खिशावर काय परिणाम होतो
कर्जे महागणार
फेडरल रिझर्व्हच्या या निर्णयामुळे मध्यावधी कर्ज महाग होईल, ज्यामुळे ग्राहक आणि व्यावसायिक पत प्रभावित होतील. त्याचवेळी, फेडरल रिझर्व्हने आगामी काळातही व्याजात मोठी वाढ करण्याचे संकेत दिले आहेत. बँक अधिकाऱ्यांनी म्हटले की, या वर्षाच्या अखेरीस व्याजदर ४.४ टक्के आणि पुढच्या वर्षी ४.६ टक्के होऊ शकतो.

जग आर्थिक संकटाच्या उंबरठ्यावर; जाणून घ्या आर्थिक मंदी म्हणजे काय, त्याचे निकष काय
आधी करोना महामारी आणि आता रशिया-युक्रेन युद्धाने जगातील सर्व देशांच्या अर्थव्यवस्था दबावाखाली आल्या आहेत. जगातील एकमेव महासत्ता असलेली अमेरिका देखील या दबावापासून दूर राहू शकली नाही. अमेरिकेचा महागाई दर लक्षणीय वाढला आहे, त्यामुळे तिथल्या प्रत्येक वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. याला सामोरे जाण्यासाठी अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेने व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

मंदीचे सावट आणखी गडद; गुंतवणूक योजना कशी तयार करावी, कोणती खबरदारी घ्यायची, जाणून घ्या
अमेरिकी अर्थव्यवस्था केवळ ०.२ टक्क्यांनी वाढ अपेक्षित
या वर्षी अमेरिकेची अर्थव्यवस्था केवळ ०.२ टक्क्यांनी वाढेल, असा अंदाज बँक अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. तीन महिन्यांपूर्वी अंदाजित १.७ टक्के वाढीपेक्षा हे खूपच कमी आहे. २०२३ ते २०२५ पर्यंत आर्थिक विकास दर दोन टक्क्यांपेक्षा कमी राहण्याचा अंदाजही अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. दुसरीकडे आर्थिक तज्ञांचे म्हणणे आहे की फेडरल रिझर्व्हने व्याजदरात तीव्र वाढ केल्याने अमेरिकी नोकऱ्या कमी होतील आणि बेरोजगारी वाढेल, ज्यामुळे या वर्षाच्या अखेरीस किंवा पुढील वर्षाच्या सुरुवातीला मंदी येऊ शकते.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.