यूपीत 2027 ची तयारी:भाजप बनवणार 4.86 लाख लाभार्थी, मन की बात प्रमुख

यूपी भाजपने २०२७ च्या विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी ४.८६ लाख कार्यकर्त्यांना ‘पदाधिकारी’ बनवले जाणार आहे. भाजप ‘व्हॉट्सॲप प्रमुख’, ‘लाभार्थी प्रमुख’ आणि ‘मन की बात प्रमुख’ या पदांवर नियुक्ती करणार आहे. अधिकाधिक कार्यकर्त्यांना पद देणे, मतदान केंद्र व सोशल मीडियावर पकड मिळवणे हा त्याचा उद्देश आहे. यूपी भाजप संघटनेचे सरचिटणीस धरमपाल सिंह म्हणाले की, आम्ही अडीच कोटी सदस्य जोडले आहेत. आता बूथ समित्या स्थापन केल्या जात आहेत. प्रत्येक बूथवर अध्यक्षांसह ११ सदस्य असतील. त्यामध्ये प्रत्येकी एक सचिव, व्हॉट्सॲप प्रमुख, मन की बात कार्यक्रम प्रमुख आणि लाभार्थी प्रमुख असतील. ५ डिसेंबरपर्यंत बूथ समित्या, १५ डिसेंबरपर्यंत विभाग अध्यक्षांची निवड होईल. यूपीत सध्या १,६२,०१२ मतदान केंद्रे आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष भूपेंद्रसिंह चौधरी म्हणाले- घटनेतील आरक्षणाच्या तरतुदीनुसार संघटनाही स्थापन होईल. लोकसभा निवडणुकीत ८.५% मते घटली या लोकसभा निवडणुकीत भाजपला यूपीमध्ये ३.६२ कोटी (४१.४%) मते मिळाली, तर २०१९ मध्ये पक्षाला ४.२८ कोटी मते (५०%) मिळाली. ८.५ टक्के मतांची ही उणीव भरून काढण्यासाठी पक्ष संघटनेची नवी रचना करत आहे. यामध्ये तरुण, मागासवर्गीय, दलित, महिला यांना महत्त्व देण्याची तयारी सुरू आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment