मुंबई– छोट्या पडद्यावरून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली लोकप्रिय अभिनेत्री सायली संजीव हिने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. ‘काहे दिया परदेस’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली सायली काही चित्रपटांमध्येही झळकली. तिने ‘हर हर महादेव’, ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटातून प्रेक्षकांवर आपल्या अभिनयाची छाप पाडली. सायली कायमच सोशल मीडियावर चर्चेत असते. ती तिच्या चित्रपटांसोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चाहत्यांमध्ये चर्चेत असते. मध्यंतरी सायलीचं नाव चेन्नई सुपरकिंग्स संघाचा लोकप्रिय क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाड याच्यासोबत जोडलं गेलं होतं. मात्र सायलीने त्यावर स्पष्टीकरण देत या सगळ्या अफवा असल्याचं म्हटलं होतं. आता पुन्हा एकदा सायलीच्या एका पोस्टवर चाहत्यांनी काही भन्नाट कमेंट केल्या आहेत.


सायलीने एखादी पोस्ट केली आणि त्यावर ऋतुराजच्या चाहत्यांनी प्रतिक्रिया दिली नाही असं क्वचितच पाहायला मिळतं. दुसरीकडे सध्या सायली परदेशात चित्रीकरण करण्यात व्यग्र आहे. ती तिथले काही फोटोही चाहत्यांसोबत शेअर करताना दिसतेय. नुकताच सायलीने तिचा परदेशातील वडापाव खातानाचा फोटो शेअर केला होता. आता त्यावर नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट केल्या आहेत. सायलीने फोटो पोस्ट करत लिहिलं, ‘यूकेमधला श्री कृष्ण वडापाव. परदेशात येऊन वडापाव खाणं म्हणजे सुख.’ तिच्या या पोस्टवर काही ऋतुराजच्या चाहत्यांनीदेखील प्रतिक्रिया दिल्या आहेत. तिला चाहत्यांनी पुन्हा एकदा वहिनी म्हणत लिहिलं, ‘वहिनी, भाऊ इकडे फायनलमध्ये गेलाय. मॅच बघायला या लवकर इंडियामध्ये.’ आणखी एका युझरने लिहिलं, ‘एक वडापाव ऋतुराज भाऊला पण घेऊन ये.’

Screenshot 2023-05-27 150601

आणखी एका युझरने लिहिलं, ‘खूप छान वहिनी.’ तर काहींनी ऋतुराजचं नावही कमेंटमध्ये लिहिलं आहे. सायली सध्या परदेशात तिच्या ‘कैरी’ या चित्रपटाचं चित्रीकरण करण्यात व्यग्र आहे.

नाचणारी बाई तर पाहिजेच, पण… गौतमी पाटीलवर शाहीर संभाजी भगत यांची पोस्ट चर्चेत

पतीसह मौनी रॉयची डिनर डेट





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *