मुंबई : ‘साराभाई vs साराभाई’ मालिकेतील अभिनेत्री वैभवी उपाध्याय हिचं २२ मे रोजी अपघाती निधन झालं. वैभवी तिच्या होणाऱ्या नवऱ्याबरोबर हिमाचल प्रदेशमध्ये फिरायला जात होती. त्यावेळी ती जात असलेली गाडी दरी कोसळली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामध्ये वैभवीचा होणारा नवरा जय गांधी हा सुदैवानं वाचला. जयनं सविस्तर अपघाताची सविस्तर घटना सांगितली आहे. आता जयनं त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून वैभवीच्या आठवणींना उजाळा देणारी भावुक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टबरोबर त्यानं पहिल्यांदा वैभवीबरोबरचा फोटो शेअर केला आहे.

jay

काय आहे पोस्ट

शनिवारी जय गांधी यानं वैभवीबरोबरचा त्याचा फोटो शेअर केला. जयनं त्याच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, ‘प्रत्येक क्षणाला, प्रत्येक मिनिटाला मला तुझी आठवण येते. तू अशी कशी जाऊ शकतेस. तुला मी कायम माझ्या हृदयात सुरक्षीत ठेवीन. खूप लवकर गेलीस गं… गुंडी खूप सारं प्रेम आणि श्रद्धांजली…’ ही पोस्ट शेअर केल्यानंतर जयनं त्याचं इन्स्टाग्राम अकाऊंट प्रायव्हेट केलं.

डिसेंबरमध्ये करणार होते लग्न

ई टाइम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये जय गांधीनं सांगितलं की,’अनेकांना वाटलं हा अपघात गाडी वेगानं जात असल्यानं झाला. परंतु असं काही नाही. आम्ही खूप सुरक्षितपणं गाडी चालवत होतो. आम्ही तो ट्रक पुढे जाण्याची वाट बघत होतो. सध्या तरी मी याबद्दल अधिक काहीच सांगू शकत नाही. पण एक नक्की की आम्ही सीट बेल्ट लावला नव्हता ही गोष्ट खोटी आह.’ वैभवी आणि जय यांचा साखरपुडा झाला होता. हे दोघंजण २ डिसेंबरला लग्न देखील करणार होते.

वहिनी भाऊ फायनलला गेलाय, आता… वडापाव खाणाऱ्या सायली संजीवला पाहून चाहत्यांच्या भन्नाट कमेंट

वैभवीच्या भावानं सांगितलं सत्य

वैभवीचा भाऊ अंकित यानं सांगितलं की, ती आणि जय कुलूला फिरायला गेले होते. दोघंजण १५ मे रोजी इथून निघाले. ते ज्या रस्त्यानं जात होते तो खूप लहान होता. दोघंजण ट्रक पुढे जाण्याची वाट बघत होते. जेव्हा ट्रक पुढे गेला तेव्हा त्याचा धक्का गाडीला लागला आणि ती दरीत पडली.

हृतिक रोशनचा एअरपोर्टवर कुल लूकSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *