वाचा: Fraud Call Alert: ‘या’ नंबरवरुन कॉल येत असेल तर लगेच करा सरकारला इन्फॉर्म, हॅकर्स राहतील दूर
Airtel चा ३१९ रुपयांचा प्रीपेड प्लान :
एअरटेलच्या ३१९ रुपयांच्या प्रीपेड रिचार्ज प्लानमध्ये दररोज २ GB डेटा, अनलिमिटेड कॉल्स आणि दररोज १०० SMS मिळतात. प्लानची वैधता ३१ दिवसांची आहे. प्लानमध्ये Apollo 24/7 Circle, Wink Music आणि मोफत HelloTune देखील आहेत. जर तुम्ही जास्त डेटा वापरत असाल तर, हा प्लान तुमच्यासाठी चांगला पर्याय असू शकतो. या प्लानसह, तुम्हाला Fastag वर १०० रुपयांचा कॅशबॅक देखील मिळेल.
एअरटेलचा २९६ रुपयांचा प्रीपेड प्लान:
एअरटेलच्या २९६ रुपयांच्या प्रीपेड प्लानमध्ये ३० दिवसांच्या वैधतेसह २५ GB डेटा उपलब्ध आहे. याशिवाय, यामध्ये दररोज १०० एसएमएस आणि ३० दिवस अमर्यादित कॉल्सची सुविधाही उपलब्ध आहे. हा प्लान Apollo 24/7 Circle, Wink Music आणि Free HelloTune सह देखील येतो .
एअरटेलचा १०९ रुपयांचा प्रीपेड प्लान :
या यादीतील सर्वात स्वस्त एअरटेल प्लानबद्दल बोलायचे झाले तर, १०९ रुपयांच्या प्लानमध्ये २०० एमबी डेटा मिळेल. प्लानमध्ये ९९ रुपयांचा टॉक टाईम देखील मिळेल. या प्लानची वैधता ३० दिवसांसाठी उपलब्ध आहे. याशिवाय, १०९ रुपयांच्या प्रीपेड प्लानमध्ये २.५ पैसे प्रति मिनिट दराने लोकल आणि एसटीडी कॉल करता येतात.
एअरटेलचा १११ रुपयांचा प्रीपेड प्लान :
१११ रुपयांच्या प्लानमध्ये तुम्हाला १०९ रुपयांच्या प्लॅनमध्ये उपलब्ध असलेल्या सर्व सुविधा मिळतील. परंतु, या प्लॅनमध्ये तुम्हाला पूर्ण महिन्याची वैधता मिळेल. यामध्ये, तुम्हाला २०० एमबी डेटा, ९९ रुपयांचा टॉकटाइम आणि ३१ दिवसांच्या पूर्ण वैधतेसह २.५ पैसे प्रति मिनिट लोकल आणि एसटीडी कॉल मिळतात.