वाल्मीक कराड शरण, तरीही मस्साजोग ग्रामस्थ आक्रमक:नववर्षाच्या पहिल्याच दिवशी करणार सामूहिक जलसमाधी आंदोलन

वाल्मीक कराड शरण, तरीही मस्साजोग ग्रामस्थ आक्रमक:नववर्षाच्या पहिल्याच दिवशी करणार सामूहिक जलसमाधी आंदोलन

वाल्मीक कराड सीआयडी ऑफिसमध्ये शरण आला आहे. मात्र, तरीही मस्साजोगच्या ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील फरार आरोपींना अटक करावी, अशी मागणी गावकऱ्यांकडून करण्यात आली आहे. त्यासाठी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सर्व ग्रामस्थ हे सामूहिक जलसमाधी आंदोलन करणार आहेत. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी निघृण हत्या झाली होती. या प्रकरणी 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाशी संबंध असल्याचा आरोप असलेला वाल्मीक कराड याने देखील आज शरणागती पत्करली. मात्र, इतर 3 आरोपी अद्याप मोकाटच आहेत. 22 दिवस उलटूनही आरोपींना पकडण्यात पोलिसांन यश आले नाही. त्यामुळे मस्साजोगचे गावकरी संतप्त झाले आहेत. तीन आरोपींना अटक करण्याची मागणी ग्रामस्थांकडून लावून धरण्यात आली आहे. मस्साजोग ग्रामस्थ 1 जानेवारी 2025 सामूहिक जल समाधी आंदोलन करणार आहेत. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी हे सामूहिक जल समाधी आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाविषयीचे मस्साजोग ग्रामस्थांनी केज तहसीलदारांना निवेदन दिले आहे. मस्साजोग शिवारात हे सामूहिक जल समाधी आंदोलन करण्यात येणार आहे. वाल्मीक कराड पोलिसांना शरण
बीडच्या मस्साजोग हत्याकांडाशी निगडीत खंडणी प्रकरणात पोलिसांना हवा असणारा वाल्मीक कराड आज अखेर सीआयडीपुढे शरण आला. तो पुण्यातल्या सीआयडीच्या कार्यालयात शरण आला. वाल्मीक कराड हा राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीसाठी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. या पार्श्वभूमीवर वाल्मीक कराड पोलिसांना शरण आला आहे. शरण येण्यापूर्वी व्हिडिओ केला शेअर वाल्मीक कराड याने मंगळवारी सकाळी एका व्हिडिओद्वारे संतोष देशमुख यांचे मारेकरी जे कुणी असतील त्यांना अटक करून फाशीची शिक्षा दिली जावी. राजकीय द्वेषापोटी माझे नाव या प्रकरणाशी जोडले जात आहे. पोलिस तपासाच्या निष्कर्षात मी दोषी आढळलो तर मी न्यायदेवता देईल ती शिक्षा भोगण्यास तयार आहे, असे म्हटले होते.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment