खंडणी प्रकरणी वाल्मीक कराडवर ईडीची कारवाई का नाही?:सुप्रिया सुळेंचा सरकारला सवाल; अनिल देशमुख, संजय राऊतांचा दिला दाखला
वाल्मीक कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर त्याच्यावर ईडीने कारवाई का केली नाही? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र आणि राज्य सरकारला केला आहे. अनिल देशमुख, संजय राऊत आणि नवाब मलिक यांच्यावर कारवाई करण्यात आली, तर मग वाल्मीक कराडवर कारवाई का झाली नाही? असाही सवाल केला. वाल्मीक कराडवर ईडीची कारवाई करावी, अशी मागणीही सुप्रिया सुळे यांनी केली. खंडणीची प्रकरणे होणार असतील, तर महाराष्ट्रात कोण गुंतवणूक करेल, असेही त्या म्हणाल्या. आम्ही राज्यकर्ते असल्यामुळे आम्हाला न्याय देऊ नका, पण कंपनीने वाल्मीक कराडवर खंडणीची केस दाखल केलेली असल्यामुळे कंपनीला न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. अनिल देशमुख, संजय राऊत आणि नवाब मलिक यांना एक कायदा आणि वाल्मीक कराडला वेगळा कायदा का? याचे उत्तर सरकारने द्यावे. हा विषय आम्ही संसदेच्या अधिवेशनात मांडणार असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या. लाडकी बहीण योजनेच्या परळीचे तालुकाध्यक्ष वाल्मीक कराड आहेत. ज्या माणसावर खंडणीचा गुन्हा दाखल असताना त्याला लाडकी बहीण योजनेच्या कमिटीचे अध्यक्ष केले जाते, हे धक्कादायक आहे. आम्ही ही बातमी अपडेट करत आहोत…