अयोध्येतील ‘त्या’ युवतीच्या न्यायासाठी वाल्मिकी समाजाचा पुढाकार:अमरावती जिल्हाधिकाऱ्यांना साकडे थेट राष्ट्रपतींनाही पाठवले निवेदन
उत्तरप्रदेशातील अयोध्येच्या एका मंदिरात सफाई कामगार म्हणून काम करणाऱ्या तरुणीवर नऊ नराधमांनी अत्याचार केला. परंतु पोलिसांनी अद्याप त्यांच्याविरुद्ध कोणतीही कारवाई केली नाही. या घटनेचे पडसाद अमरावतीत उमटले असून वाल्मिकी समाज विकास परिषदेने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत थेट राष्ट्रपतींना न्यायासाठी साकडे घातले आहे. परिषदेचे संस्थापक अध्यक्ष गणेश तंबोले, कार्यकारी अध्यक्ष अशोक सारवान व ज्येष्ठ पदाधिकारी किशोर धामणे यांच्या नेतृत्वात एका प्रतिनिधीमंडळाने जिल्हाधिकारी यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यामार्फत थेट महामहीम राष्ट्रपतींना निवेदनही पाठविण्यात आले. प्रारंभी परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात निदर्शने करुन न्याय मिळण्यासाठीच्या घोषणा दिल्या. परिषदेच्या निवेदनानुसार सदर मुलगी ही बीए ची विद्यार्थीनी आहे. कौटुंबिक स्थिती बेताची असल्यामुळे ती मंदिरात साफ-सफाईचे काम करते. दरम्यान अयोध्येतील त्याच मंदिरात रोज ये-जा करणाऱ्या नऊ युवकांनी तिला वेगवेगळ्या जागी नेऊन तिच्यावर अत्याचार केला. १६ ऑगस्ट ते २ सप्टेंबर या काळात ही घटना घडली. या घटनेची तक्रार करण्यासाठी ती युवती पोलिस ठाण्यात गेली असता तिला पोलिसांकडूनही सहकार्य मिळाले नाही, असा परिषदेचा आरोप आहे. त्यामुळे हे प्रकरण शीघ्रगती न्यायालयाकडे सोपवून दोषींवर कठोर कारवाई केली जावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या मागणीचे निवेदन पंतप्रधान, राज्याचे मुख्यमंत्री तसेच अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष यांनाही पाठविण्यात आले आहे. …तर देशभर आंदोलन सदर युवतीवर अत्याचार करणाऱ्यांवर त्वरेने कारवाई न केल्यास देशभर आंदोलन उभे करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. परिषदेच्या मते वाल्मिकी समाज हा हिंदू धर्माचा अवलंब करणारा आहे. परंतु त्याला अजूनही अतिमागास म्हणूनच वागविले जाते. त्यामुळे सामाजिक न्याय आदी मुद्दे हे या समाजापासून कोसो दूर आहेत. शासनाने याकडेही लक्ष द्यावे, अशी मागणीसुद्धा राष्ट्रपतींना पाठविलेल्या निवेदनात नमूद करण्यात आली आहे.