वंदे भारत स्लीपर रेल्वेगाडी तयार; 2 महिन्यांत धावणार:पुढील 10 दिवसांत या गाडीची चाचणी सुरू होणार
वंदे भारत स्लीपर रेल्वेची पहिली जोडी रविवारी तयार झाली. पुढील १० दिवसांत ही गाडी चाचणीसाठी रवाना करण्यात येणार आहे. २ महिन्यानंतर ही रेल्वे प्रवाशांच्या सेवेत रुजू होणार आहे. वंदे भारत रेल्वेत सध्या केवळ चेअर कार (केवळ बसता येईल अशी) आणि वंदे भारत मेट्रो (शहरात धावणारी) आणि वंदे भारत स्लीपर रेल्वे आहेत. परंतु या तिन्ही गाड्या एसी क्लासच्या अाहेत. एसीशिवाय प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अमृत भारत रेल्वे गाडी असेल. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव ‘भास्कर’शी बोलताना म्हणाले, या गाडीचे भाडे राजधानी गाडीइतकेच असेल. सुरुवातीला ८०० ते १२०० किमीपर्यंत ती धावेल. रात्रीच्या प्रवासासाठी ही रेल्वे प्रवाशांची पहिली पसंती असावी असा यामागे उद्देश आहे. या गाडीत उत्तम सीट, प्रवासावेळी अत्यंत कमी कंपने जाणवतील.
राजधानी-शताब्दी रेल्वे बंद होणार आहेत का? कालौघात वंदे भारत आणि अमृत रेल्वेंच्या गाड्या हीच भारतीय रेल्वेची ओळख बनतील असे रेल्वे बोर्डाचे अधिकारी म्हणतात. राजधानी, शताब्दी रेल्वेगाड्यांनी खूप मोठे योगदान दिले. आता वंदे भारत आणि अमृत भारत गाड्यांवर ही जबाबदारी असेल. तंत्रज्ञानामुळे आता इंजिन व गाडीला वेगवेगळे लावण्याची गरज भासणार नाही.