राजकारण:फुलंब्रीचे तिकीट सत्काराने मिळेल की सत्कार्याने? इच्छुकांचा हेतू नानांना माहिती

भारतीय जनता पक्षाचे फुलंब्रीचे आमदार हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती केल्यानंतर उमेदवारीसाठी इच्छुकांनी त्यांच्या सत्कारांचा धडाका सुरू केला आहे. शिस्तप्रिय, स्वच्छ व्यक्तिमत्त्व असलेले बागडे यांनी जिल्हा सहकारी दूध संघ, साखर कारखाना यांच्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी मोठे कार्य केले आहे. त्यामुळे बागडे यांचे उत्तराधिकारी निवडताना ‘सत्कार’ कामी येणार की ‘सत्कार्य’ महत्त्वाचे ठरणार हे येणारा काळच सांगेल. पण, ‘आताच एवढे मोठे कार्यक्रम का होत आहेत?’ असे सांगून बागडे नानांनी सत्कारामागचे हेतू आपण जाणतो हे स्पष्ट केले.
माजी महापौर भगवान घडमोडे यांनी रविवारी फुलंब्री मतदारसंघातील जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या गौरव सोहळ्याचे आयोजन केले होते. ‘बापूंनी (घडमोडे) मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम ठेवला. त्याचे कारण तुम्हाला माहीत आहे. नेमके हेच वर्ष कसे निवडले बघा. जास्त खोलामध्ये जात नाही,’ अशी मिश्कील टिप्पणी बागडेंनी केली.
इच्छुक उमेदवार किशोर शितोळे यांनीही केला सत्कार
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत फुलंब्री बाजार समितीच्या सभापती अनुराधा चव्हाण यांनी राज्यपाल बागडे यांच्या गौरव समारंभाचे आयोजन केले होते. गौरव समारंभाची समिती बनवण्यात आली असली तरी प्रमुख भूमिका इच्छुक असलेल्या अनुराधा चव्हाण यांचीच होती. देवगिरी नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष किशोर शितोळे यांनी बँकेतर्फे सत्काराचे आयोजन केले. बागडे बँकेचे संस्थापक असून काही काळ अध्यक्ष होते. त्यांच्या काळात बँकेची भरभराट झाल्याने सत्काराचे आयोजन केल्याचे शितोळे यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.
फुलंब्रीसाठी इच्छुकांची झाली भाऊगर्दी
इच्छुकांच्या संख्येत वाढ होत असून बागडे यांच्यासमोर शक्तिप्रदर्शन केल्याने उमेदवारीचा मार्ग माेकळा होईल अशी आशा इच्छुकांना आहे. फुलंब्री विधानसभेसाठी भाजपमध्ये पूर्वी ७ पदाधिकारी प्रबळ दावेदार होते. अलीकडे एक जणाची भर पडली आहे. पक्षाने ७ जणांना एकत्रित कार्यक्रम घेण्याची सूचना केली होती. या ७ इच्छुकांमधून उमेदवार निवडला जाईल असे वातावरण पक्षाने तयार केले आहे. अनुराधा चव्हाण, फुलंब्रीचे नगराध्यक्ष सुहास सिरसाठ, माजी महापौर भगवान घडमोडे, संभाजीनगर बाजार समितीचे सभापती राधाकिसन पठाडे, संचालक रामबाबा शेळके, रामुकाका शेळके, विजय औताडे आदींचा समावेश होता. त्यात किशोर शितोळे यांची भर पडली आहे. सावे, डॉ. कराड यांच्या भाषणावेळी प्रोटोकॉलची चर्चा
राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचा हस्ते शिक्षक गाैरव सेहळ्यात अतुल सावे आणि डाॅ. भागवत कराड दाेघेही एकाच वेळी भाषणासाठी उठले. प्रोटोकाॅलनुसार खासदारांनंतर मंत्र्यांचे भाषण अपेक्षित आहे. त्यामुळे सावे यांना थांबवून डाॅ. कराड यांनी भाषण केले. कार्यक्रमस्थळी प्रोटोकॉलची चर्चा होती.

​भारतीय जनता पक्षाचे फुलंब्रीचे आमदार हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती केल्यानंतर उमेदवारीसाठी इच्छुकांनी त्यांच्या सत्कारांचा धडाका सुरू केला आहे. शिस्तप्रिय, स्वच्छ व्यक्तिमत्त्व असलेले बागडे यांनी जिल्हा सहकारी दूध संघ, साखर कारखाना यांच्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी मोठे कार्य केले आहे. त्यामुळे बागडे यांचे उत्तराधिकारी निवडताना ‘सत्कार’ कामी येणार की ‘सत्कार्य’ महत्त्वाचे ठरणार हे येणारा काळच सांगेल. पण, ‘आताच एवढे मोठे कार्यक्रम का होत आहेत?’ असे सांगून बागडे नानांनी सत्कारामागचे हेतू आपण जाणतो हे स्पष्ट केले.
माजी महापौर भगवान घडमोडे यांनी रविवारी फुलंब्री मतदारसंघातील जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या गौरव सोहळ्याचे आयोजन केले होते. ‘बापूंनी (घडमोडे) मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम ठेवला. त्याचे कारण तुम्हाला माहीत आहे. नेमके हेच वर्ष कसे निवडले बघा. जास्त खोलामध्ये जात नाही,’ अशी मिश्कील टिप्पणी बागडेंनी केली.
इच्छुक उमेदवार किशोर शितोळे यांनीही केला सत्कार
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत फुलंब्री बाजार समितीच्या सभापती अनुराधा चव्हाण यांनी राज्यपाल बागडे यांच्या गौरव समारंभाचे आयोजन केले होते. गौरव समारंभाची समिती बनवण्यात आली असली तरी प्रमुख भूमिका इच्छुक असलेल्या अनुराधा चव्हाण यांचीच होती. देवगिरी नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष किशोर शितोळे यांनी बँकेतर्फे सत्काराचे आयोजन केले. बागडे बँकेचे संस्थापक असून काही काळ अध्यक्ष होते. त्यांच्या काळात बँकेची भरभराट झाल्याने सत्काराचे आयोजन केल्याचे शितोळे यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.
फुलंब्रीसाठी इच्छुकांची झाली भाऊगर्दी
इच्छुकांच्या संख्येत वाढ होत असून बागडे यांच्यासमोर शक्तिप्रदर्शन केल्याने उमेदवारीचा मार्ग माेकळा होईल अशी आशा इच्छुकांना आहे. फुलंब्री विधानसभेसाठी भाजपमध्ये पूर्वी ७ पदाधिकारी प्रबळ दावेदार होते. अलीकडे एक जणाची भर पडली आहे. पक्षाने ७ जणांना एकत्रित कार्यक्रम घेण्याची सूचना केली होती. या ७ इच्छुकांमधून उमेदवार निवडला जाईल असे वातावरण पक्षाने तयार केले आहे. अनुराधा चव्हाण, फुलंब्रीचे नगराध्यक्ष सुहास सिरसाठ, माजी महापौर भगवान घडमोडे, संभाजीनगर बाजार समितीचे सभापती राधाकिसन पठाडे, संचालक रामबाबा शेळके, रामुकाका शेळके, विजय औताडे आदींचा समावेश होता. त्यात किशोर शितोळे यांची भर पडली आहे. सावे, डॉ. कराड यांच्या भाषणावेळी प्रोटोकॉलची चर्चा
राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचा हस्ते शिक्षक गाैरव सेहळ्यात अतुल सावे आणि डाॅ. भागवत कराड दाेघेही एकाच वेळी भाषणासाठी उठले. प्रोटोकाॅलनुसार खासदारांनंतर मंत्र्यांचे भाषण अपेक्षित आहे. त्यामुळे सावे यांना थांबवून डाॅ. कराड यांनी भाषण केले. कार्यक्रमस्थळी प्रोटोकॉलची चर्चा होती.  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment