मुंबई: मुंबईतील २३ वर्षांच्या सानिया शेख नावाच्या तरुणीच्या हत्याकांडाचं रहस्य उलगडलं आहे. १३ महिन्यांपूर्वी सानियाची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाची उकल करण्यात अखेर पोलिसांना यश आलं आहे. पती आणि दिरानं मिळून सानियाची हत्या केली. पतीनं सानियाचं शिर धडावेगळं केलं. त्यानंतर भावाच्या मदतीनं तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली. पोलिसांना अद्यापही सानियाचं शिर सापडलेलं नाही.

वसई पोलिसांनी शनिवारी सानिया शेखच्या हत्या प्रकरणात आरोपी दिराला अटक केली. हत्या प्रकरणाचा छडा लागल्याचं पोलिसांनी सांगितलं. गेल्या वर्षीच्या जुलैमध्ये सानियाचा मृतदेह भुईगावातील नाल्यात सापडला. मात्र तिचं शिर अद्याप सापडू शकलेलं नाही. त्याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.
हॉटेलच्या खोलीत पतीला दुसऱ्या महिलेसोबत पकडलं; पत्नीनं चपलेनं चोप चोप चोपलं
सानियाच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी धक्कादायक माहिती दिली आहे. सानियाचा पती आसिफ शेखनं पत्नीचं शिर धडावेगळं केलं. त्यानंतर धड नाल्यात फेकून दिलं. गेल्या शनिवारी पोलिसांनी आसिफचा भाऊ युसूफ शेखला पुरावे नष्ट केल्या प्रकरणी अटक केली. युसूफनं सानिया शिर नसलेला मृतदेह सूटकेसमध्ये भरून स्वत:च्या कारनं भुईगावातील समुद्र किनाऱ्यावर फेकला.

आसिफ आणि सानिया यांचा निकाह २०१७ मध्ये झाला होता. लग्नानंतर आसिफ आणि त्याचे आई-वडील, भाऊ युसूफ शेख, पत्नी सानिया आणि एक मुलगी नालासोपारा पश्चिमेत टू बीएचकेमध्ये वास्तव्यास होता. लग्नानंतर आसिफच्या कुटुंबानं सानियाचा हुंड्यासाठी छळ सुरू केल्याचा आरोप सानियाचे काका जहूर मोकाशी यांनी केला.
सिर तन से जुदा! धमकी मिळाल्याचं म्हणत डॉक्टरांनी पोलीस ठाणे गाठले; तपासानंतर स्वत:च अडकले
सानियानं तिच्या कुटुंबियांशी ८ जुलै २०२१ रोजी शेवटचा संवाद साधला. त्यानंतर तिच्याशी संवाद होऊ शकला नाही. मुलीच्या भेटीसाठी मोकाशी आणि काही नातेवाईक मुंबईला आले. त्यावेळी आसिफच्या कुटुंबानं नालासोपाऱ्यातील फ्लॅट विकल्याचं त्यांना समजलं. आसिफचं कुटुंब चेंबूरला स्थायिक झाल्याची माहिती त्यांना मिळाली. सानियाच्या कुटुंबानं बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. त्याच महिन्यात पोलिसांना एक शिर नसलेला मृतदेह सापडला. पोलिसांनी त्याची डीएनए चाचणी केली. यानंतर पती आसिफला अटक केली.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.