मांजरेकरांच्या या चित्रपटात अभिनेता हार्दिक जोशी, जय दुधाणे, विशाल निकम, उत्कर्ष शिंदे, प्रवीण तरडे, विराट मडके, सत्या मांजरेकर यांची वर्णी लागली होती. मात्र एका व्हिडिओमुळे सत्याला चित्रपटातून काढून टाकण्यात आले आहे का असा प्रश्न उभा राहिला आहे. आरोह वेलणकर याने त्याच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यात आरोह, जय, विशाल, उत्कर्ष, प्रवीण, विराट सगळेच दिसत आहेत मात्र सत्या त्यात नाहीये. तर त्याच्याजागी आरोह दिसत आहे. सगळेच जीममध्ये मेहनत करताना दिसत आहेत. मात्र त्यात सत्या मात्र नाहीये. चित्रपटासाठी सगळे मेहनत करत असताना सत्या तिथे नसल्याने तो चित्रपटात नाहीये का, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. त्यात सगळेच कलाकार आपापल्या इंस्टाग्रामवर वर्कआऊट करतानाचे व्हिडीओ शेअर करत आहेत. मात्र सत्या तसं करताना दिसत नाहीये.
तर त्याजागी आरोह दिसल्याने सत्याची भूमिका आरोह साकारणार असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आता नेमकं काय खरं हे येत्या काही दिवसात कळेलच. तर दुसरीकडे सत्याने नुकतंच हॉटेल व्यवसायात पाऊल टाकलं आहे. त्याने ‘सुका सुखी’ या नावाने हॉटेल सुरू केलं आहे.
‘आई कुठे काय करते’ फेम गौरी कुलकर्णीचा मोठा अपघात; बाइकस्वाराची धडक, थोडक्यात बचावला जीव