वेध परिषद:गजानन मंदिर संस्थानचा वेध परिषदेत पुढाकार; सामाजिक प्रबोधनातून नव्या पिढीला दिली प्रेरणा

वेध परिषद:गजानन मंदिर संस्थानचा वेध परिषदेत पुढाकार; सामाजिक प्रबोधनातून नव्या पिढीला दिली प्रेरणा

मंदिराच्या माध्यमातून आध्यात्मिक संस्कार, उत्सव करतानाच नव्या पिढीला वैज्ञानिक दृष्टी देणेदेखील गरजेचे आहे. या उद्देशाने गजानन महाराज मंदिर संस्थानने ‘वेध परिषदेत’ पुढाकार घेतला अन् यामध्ये चार व्याख्यात्यांचा रोमांचकारी प्रवास मुलाखतींच्या माध्यमातून उलगडला. आध्यात्मिक संस्थेने अशा प्रकारचा पुढाकार घेण्याचे हे पाऊल समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. प्रख्यात मानसोपचारतज्ज्ञ, समुपदेशक आणि लेखक डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या वेध परिषदेचे शहरातील १३ वे सत्र रविवारी (२९ सप्टेंबर) पार पडले. एमजीएमच्या रुक्मिणी सभागृहात सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळेत ही परिषद झाली. भारतीय संसद प्रणाली व लोकशाही पद्धतीची तरुणांना ओळख व्हावी यासाठी काम करणारे यंग इंडियन्स संस्थेचे सहअध्यक्ष सीए असीम अभ्यंकर यांचे अनुभवही विद्यार्थ्यांना ऐकायला मिळाले. ओंकार विद्यालय, रोटरी क्लब इलाइट आणि गजानन महाराज मंदिर संस्थान यांनी या परिषदेचे आयोजन केले होते. पद्मश्री पुरस्कार मिळवण्याचे‎स्वप्न उराशी बाळगा : पेटकर‎ १९६५ च्या युद्धात नऊ गोळ्या लागून कायमचे अपंगत्व आल्यानंतरही मी हार मानली नाही. भारताला पहिले पॅरालिम्पिक सुवर्णपदक मिळवून देण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली. टेल्कोपासून पद्मश्री पुरस्कारापर्यंतचा प्रवास करताना उद्दिष्ट स्पष्ट होते. हिंमत खचू दिली नाही अन् त्यानंतर इतिहास घडला, असे मुरलीकांत पेटकर यांनी सांगितले. हा प्रवास ऐकताना उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभा राहिला. देशातील प्रत्येक विद्यार्थ्याने किमान पद्मश्री पुरस्कार मिळवण्याचे ध्येय बाळगावे आणि त्या दृष्टीने आपल्या क्षेत्रात कठोर मेहनत घ्यावी, असे पेटकर म्हणाले. दुसऱ्यांच्या प्रश्नांना आपलेसे‎ करा :सुमेधाताई चिथडे‎ दुसऱ्यांचे प्रश्न हे आपलेसे वाटले पाहिजेत, स्वतःपलीकडचे जगणे हेच खरे जगणे आहे. जोवर आपण स्वत:च्या कक्षांबाहेर पडणार नाही तोवर आपण वेगळे काही करू शकत नाही. जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही. फक्त ती करण्याची पद्धत वेगळी असते. तीच आपल्याला शोधायची असते. यासाठी अथक परिश्रम आणि मेहनत करावी लागते, असे मत काश्मीरमधील कुपवाडा आणि सियाचिनमध्ये सैनिकांसाठी ऑक्सिजन जनरेशन प्लँट उभारणाऱ्या सुमेधाताई चिथडे यांनी व्यक्त केले.

​मंदिराच्या माध्यमातून आध्यात्मिक संस्कार, उत्सव करतानाच नव्या पिढीला वैज्ञानिक दृष्टी देणेदेखील गरजेचे आहे. या उद्देशाने गजानन महाराज मंदिर संस्थानने ‘वेध परिषदेत’ पुढाकार घेतला अन् यामध्ये चार व्याख्यात्यांचा रोमांचकारी प्रवास मुलाखतींच्या माध्यमातून उलगडला. आध्यात्मिक संस्थेने अशा प्रकारचा पुढाकार घेण्याचे हे पाऊल समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. प्रख्यात मानसोपचारतज्ज्ञ, समुपदेशक आणि लेखक डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या वेध परिषदेचे शहरातील १३ वे सत्र रविवारी (२९ सप्टेंबर) पार पडले. एमजीएमच्या रुक्मिणी सभागृहात सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळेत ही परिषद झाली. भारतीय संसद प्रणाली व लोकशाही पद्धतीची तरुणांना ओळख व्हावी यासाठी काम करणारे यंग इंडियन्स संस्थेचे सहअध्यक्ष सीए असीम अभ्यंकर यांचे अनुभवही विद्यार्थ्यांना ऐकायला मिळाले. ओंकार विद्यालय, रोटरी क्लब इलाइट आणि गजानन महाराज मंदिर संस्थान यांनी या परिषदेचे आयोजन केले होते. पद्मश्री पुरस्कार मिळवण्याचे‎स्वप्न उराशी बाळगा : पेटकर‎ १९६५ च्या युद्धात नऊ गोळ्या लागून कायमचे अपंगत्व आल्यानंतरही मी हार मानली नाही. भारताला पहिले पॅरालिम्पिक सुवर्णपदक मिळवून देण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली. टेल्कोपासून पद्मश्री पुरस्कारापर्यंतचा प्रवास करताना उद्दिष्ट स्पष्ट होते. हिंमत खचू दिली नाही अन् त्यानंतर इतिहास घडला, असे मुरलीकांत पेटकर यांनी सांगितले. हा प्रवास ऐकताना उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभा राहिला. देशातील प्रत्येक विद्यार्थ्याने किमान पद्मश्री पुरस्कार मिळवण्याचे ध्येय बाळगावे आणि त्या दृष्टीने आपल्या क्षेत्रात कठोर मेहनत घ्यावी, असे पेटकर म्हणाले. दुसऱ्यांच्या प्रश्नांना आपलेसे‎ करा :सुमेधाताई चिथडे‎ दुसऱ्यांचे प्रश्न हे आपलेसे वाटले पाहिजेत, स्वतःपलीकडचे जगणे हेच खरे जगणे आहे. जोवर आपण स्वत:च्या कक्षांबाहेर पडणार नाही तोवर आपण वेगळे काही करू शकत नाही. जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही. फक्त ती करण्याची पद्धत वेगळी असते. तीच आपल्याला शोधायची असते. यासाठी अथक परिश्रम आणि मेहनत करावी लागते, असे मत काश्मीरमधील कुपवाडा आणि सियाचिनमध्ये सैनिकांसाठी ऑक्सिजन जनरेशन प्लँट उभारणाऱ्या सुमेधाताई चिथडे यांनी व्यक्त केले.  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment