[ad_1]

नवी मुंबई : भरधाव वेगाने वाहने चालवत भयानक अपघात घडलेले आपल्याला पाहायला मिळतात. असाच एक भीषण अपघात पनवेल शहरामध्ये झाला आहे. या भीषण अपघातात दोन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

पनवेल येथून नवी मुंबईच्या दिशेने येत असलेल्या भरधाव होंडा सिटी कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला असलेल्या लोखंडी कठड्याला धडकून पलटी झाली. या भीषण अपघातात कार चालक तरुणाचा आणि तरुणीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी मध्यरात्री पनवेल येथील टी-पाँईटजवळ घडली. हा अपघात इतका भीषण होता की, कारचा अक्षरश: चेंदामेंदा झाला होता. पनवेल शहर पोलिसांनी या अपघाताप्रकरणी कार चालक तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा जालना दौरा रद्द; मनोज जरांगेंची भेट होणार नाही, CM राजभवनात पुस्तक प्रकाशन सोहळ्याला उपस्थित
या अपघातातील मृत तरुण-तरुणीचे नाव चैतन्य सुरेश फडाळे (वय २५) आणि दृष्टी देवेंद्र खाडे (वय २४) अशी आहेत. चैतन्य हा सानपाडा सेक्टर-४ मधील ड्रीमलँड सोसायटीत राहत होता. तसेच तो सिव्हील इंजिनियर होता. तर दृष्टी खाडे हि कांजुरमार्ग येथील एनसीएच कॉलनी येथे राहण्यास होती. चैतन्य आणि दृष्टी हे दोघेही मित्र असल्याने सोमवारी सांयकाळी हे दोघेही एकत्र भेटले होते. त्यानंतर चैतन्य आणि दृष्टी हे दोघेही होंडा सिटी कारने पनवेलमध्ये गेले होते. रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास हे दोघेही पनवेल येथून जेएनपीटी रोडने उलवे मार्गे नवी मुंबईत येत होते. यावेळी त्यांची कार पनवेल येथील टी-पाँईटजवळ आली असताना भरधाव वेगात असलेल्या कारवरील चैतन्यचे नियंत्रण सुटले.

सदर कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या लोखंडी कठड्याला धडकून सदर कार पलटी होऊन पुन्हा सरळ झाली. तसेच उजव्या बाजूला येऊन पडली. या भीषण अपघातात चैतन्य आणि दृष्टी दोघेही जागीच ठार झाले. या घटनेची माहिती मिळताच पनवेल शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोघांचे मृतदेह रुग्णालयात पाठवून दिले.

चैतन्य याने भरधाव वेगात बेजबाबदारपणे कार चालवल्यामुळे सदरचा अपघात घडल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले आहे. त्यानुसार पनवेल शहर पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. चैतन्य आणि दृष्टी हे दोघेही पनवेलमध्ये कुठे गेले होते? आणि कशासाठी गेले होते? हे त्यांच्या घरच्यांना देखील माहिती नसल्याचे त्यांच्या चौकशीत आढळून आले आहे.

“बोलून मोकळं व्हायचं अन्…” व्हिडिओवरुन विरोधकांची टीकेची झोड, एकनाथ शिंदेंचं उत्तर, आतापर्यंत काय घडलं?

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *