नवी दिल्ली : VI Budget Plans :Vodafone Idea, देशातील तिसरी सर्वात मोठी टेलिकॉम ऑपरेटर कंपनी आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कायमच नव-नवीन आणि विविध किमतीत येणारे प्लान्स ऑफर करत असते. काही प्लान्स कमी किंमतीत दीर्घ वैधतेसह येत असून हे प्लान्स अशा लोकांसाठी खूप खास आहेत जे त्यांचे सिम सक्रिय ठेवण्यासाठी Budget Plans शोधत आहेत. आज आम्ही तुम्हाला Vodafone-Idea च्या तीन प्रीपेड प्लान्सबद्दल सांगणार आहो. जे सिम सक्रिय ठेवण्यासाठी आणि कमी बजेट युजर्ससाठी सर्वोत्तम आहेत.

वाचा: Best Plans: बेस्ट ! ‘या’ प्लानमध्ये २००० GB डेटासह ८ OTT अॅप्सचे सब्सक्रिप्शन, पहिल्या रिचार्जवर ५०० रुपयांचा डिस्काउंट सुद्धा

Vodafone-Idea चा ९९ रुपयांचा प्रीपेड प्लान :

Vodafone Idea चा ९९ रुपयांचा प्रीपेड कमी बजेट असलेल्या युजर्ससाठी एक उत्तम पर्याय आहे. हा प्लान २०० MB डेटा आणि २८ दिवसांच्या वैधतेसह येतो. याच्या इतर फायद्यांमध्ये ९९ रुपयांचा टॉकटाइम ( २.५ पैसे प्रति सेकंद दराने कॉलसह फक्त ६६ मिनिटे) समाविष्ट आहे. एसएमएसचा कोणताही फायदा नाही. परंतु, युजर्स नंबर पोर्ट करण्यासाठी एसएमएस पाठवू शकतात.

वाचा: फुकटात मिळतेय म्हणून खूप Public Wi-Fi वापरत असाल तर, तुम्हीही येऊ शकता हॅकर्सच्या निशाण्यावर, पाहा सेफ्टी टिप्स

Vi चा १०७ रुपयांचा प्लान :

Vodafone Idea च्या या प्लानचे फायदे ९९ .च्या प्रीपेड प्लानसारखेच आहेत. परंतु वैधता आणि ऑफर केलेल्या एकूण टॉक टाइममध्ये फरक आहे. युजर्सना या प्लानसह ३० दिवसांची वैधता १० रुपयांच्या टॉकटाइमसह मिळते (२.५ पैसे प्रति सेकंद दराने आकारले जाते). यामध्ये Vodafone-Idea युजर्सना २०० MB डेटा देखील देते.

Vodafone- Idea चा १११ रुपयांचा प्रीपेड प्लान :

१११ रुपयांचा प्रीपेड प्लान २०० MB डेटा आणि १११ रुपयांचा टॉकटाइम (२.५ पैसे प्रति सेकंद दर आकारला जातो ) सह येतो. या प्लॅनसह ऑफर केलेली एकूण वैधता ३१ दिवसांची आहे. म्हणजेच तुमचे सिम ३१ दिवस अॅक्टिव्ह असेल.

वाचा: Smartphone Price Cut: Xiaomi च्या ‘या’ शानदार स्मार्टफोनच्या किमतीत झाली कपात, फोन १७ मिनिटांत होतो फुल चार्जSource link

Leave a Reply

Your email address will not be published.