विदर्भात आज हवामान विभागाचा यलो अलर्ट:विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता
राज्यात मागील काही दिवसापासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यात विदर्भात आजही पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. विदर्भात आज विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे विदर्भातील नागरिकांनी अलर्ट राहण्याचा इशारा देखील प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार विदर्भासाठी आज यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे विदर्भातील नागरिकांनी सतर्क राहावे, असा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे. विदर्भात गेल्या दोन दिवसापासून जोरदार पाऊस पडत आहे. त्यात आजही पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. विदर्भासह राज्यातील काही भागात देखील आज जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाच्या वतीने वर्तवण्यात आली आहे. राज्यातील काही भागात पावसाने धुमाकूळ घातला आहे. मराठवाड्यात देखील हिंगोली, नांदेड, परभणी, आदी जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे शेतीचे देखील प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. धरणांच्या पाणी साठ्यात देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्याचबरोबर हवामान विभागाने राज्यातील काही भागात आजही जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यात विदर्भाला आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. 72 तासांच्या आत नुकसान झाल्याची माहिती कळवणे बंधनकारक राज्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मराठवाडा आणि विदर्भातील हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत पिक विमा काढलेला शेतकऱ्यांना 72 तासांच्या आत नुकसान झाल्याची माहिती कळवणे बंधनकारक आहे. त्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन देखील प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश राज्य सरकारच्या वतीने देण्यात आले आहे. इन्शुरन्स कंपनीकडे पिक विम्याची संपूर्ण माहिती भरा आणि तक्रार दाखल करा, असे आवाहन देखील प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. आदित्य ठाकरे यांचा मराठवाडा दौरा अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते तथा आमदार आदित्य ठाकरे यांनी मराठवाड्यातील शेतकरी बांधवांशी संवाद साधला. नदीला आलेल्या मोठ्या पुरामुळे गावकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्य शासनाने सदरील गावकऱ्यांच्या मागण्या पूर्ण न केल्यास शिवसेनेच्या वतीने तातडीने व्यवस्था करण्यात येईल. तसेच प्रशासनाला कळवून गावकऱ्यांचे हे प्रश्न मार्गी लावले जातील असा विश्वास गावकऱ्यांना आदित्य ठाकरे यांनी दिला.