मुंबई :आई कुठे काय करते मालिकेत काही दिवस मंगळागौरीचे खेळ चांगलेच रंगले होते. कुटुंबातल्या सर्व स्त्रिया एकत्र आल्या. अगदी अरुंधतीनंही संजनाला आपला सोन्याचा हार दिला. संजना आणि कांचनही मनानं जवळ आल्या. कांचननं संजनाला शेवटी सुनेचा मान दिलाच.

शर्मनच्या निधनाची उडाली अफवा, सासऱ्यांबद्दलही पसरलेली खोटी बातमी

आता एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात कांचन आणि आप्पांसमोरच अनिरुद्ध आणि संजनाचं भांडण सुरू झालं आहे. त्यात संजना अनिरुद्धला म्हणते, तो शेखर काही तरी धडपड करतोय. तू तर काहीच करत नाहीस. यावर अनिरुद्ध भडकतो. तो म्हणतो, मग तू राहतेस कशाला? तू माझी दुसरी बायको आहेस. त्यामुळे घरात आणि समाजात तुला काही मान नाही.

मंगळागौरीनिमित्त घरात शेजारणी जमल्या होत्या. त्यातली एक महिला म्हणते, काॅलेजमध्ये जाणंही आता कठीण होणार आहे. तर दुसरी म्हणते, या वयातल्या मुलींना इतकं स्वातंत्र्य देऊच नये. त्यावर अरुंधती बाकी एकदम चोख उत्तर देते. ती म्हणते, ‘१८-२० वर्षांच्या मुलींना काय घरात कोंडून ठेवणार? शाळा-काॅलेजमध्ये स्वसंरक्षण हा विषय शिकवला पाहिजे. तसं होत नसेल तर आपण शिकवायचं.’

स्वतः सलमान खानने दिली फरमानी नाझला ‘बिग बॉस १६’ ची ऑफर

अरुंधतीच्या या बोलण्यानं ईशाला एकदम हायसं वाटतं. आई आपल्या मागे उभी आहे, याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे. मालिकेत मंगळागौरीच्या खेळाचे बरेच भाग सुरू आहेत. त्यात आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात कांचन अगोदर उखाणा घेताना दाखवली आहे. आजी उखाणा घेते, ‘झालं लग्न, झाल्या भेटीगाठी, विनायकरावांचं नाव असतं बारा महिने ओठी.’ तर इकडे आप्पांनाही उखाणा घ्यायचा आग्रह होतो. मग ते घेतात, ‘मनी वसे ते स्वप्नी दिसे, कांचनची भीती झोपेतसुद्धा असे.’

‘आई कुठे काय करते’मध्ये मंगळागौर साजरीSource link

Leave a Reply

Your email address will not be published.