चंद्रपूर: घोणस सापाच्या नावानंही अनेकांचा थरकाप उडतो. सर्पमित्रसुद्धा घोणस सापाला पकडताना फार काळजी घेतात. अतिशय विषारी असलेल्या या सापाला भक्ष्य करण्यासाठी नाग साप सरसावला. घोणस सापाला नाग गिळतानाचा थरार अनेकांनी अनुभवला. असा प्रसंग क्वचित घडतो. घोणस आणि नाग सापाचा हा थरार गोंडपिपरी तालुक्यातील विहिरगाव येथे घडला.

नागाने घोणस सापाला गिळण्यासाठी त्याच्यावर हल्ला केला. हे दुर्मिळ दृश्य पाहण्यासाठी गावकऱ्यांनी गर्दी केली. यानंतर गावकऱ्यांनी सर्पमित्र दिपक वांढरे यांना बोलावले. मोठ्या शिताफीने वांढरे यांनी दोन्ही सापांना जेरबंद केले. पकडलेल्या सापांना खुल्या वनक्षेत्रात सोडण्यात आलं.

सापांचा थरार बघताना गोंडपिपरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार जीवन राजगुरू थक्क झाले. अगदी घराजवळ सापांची जुगलबंदी सुरू असल्याने सर्पमित्रांचा सोबतीला ठाणेदारही धावून गेले. सापांना पकडण्यासाठी ठाणेदारही सरसावले.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.