मुंबई: बॉलिवूडमध्ये ‘परदेस’ चित्रपटात काम करून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री महिमा चौधरी हिला स्तनाचा कर्करोग (Mahima Chaudhary Breast Cancer) झाल्याची माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडिया पोस्ट करत माहिती दिली होती. अभिनेत्री महिमा चौधरी ‘ब्रेस्ट कॅन्सर’शी झुंज देत असल्याचे त्यांनी सांगितले होते, शिवाय ती हळूहळू यातून बरी होत असल्याचेही त्यांनी म्हटले. महिमाच्या चाहत्यांसाठी ही बाब अत्यंत धक्कादायक होती.

दरम्यान महिमा चौधरीचा आणखी एक व्हिडिओ अनुपम खेर यांनी शेअर केला आहे. ‘द सिग्नेचर’ या अनुपम खेर यांच्या अपकमिंग प्रोजेक्टच्या सेटवरील काही व्हिडिओ आणि फोटो एकत्रित करुन त्यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. महिमा अँड आय (Mahima and I) अशा नावाचा त्यांचा हा व्हिडिओ महिमा चौधरीच्या धैर्याचं कौतुक करणारा आहे.

हे वाचा-राजकीय मुद्द्यांवर का शांत राहतात शाहरुख, सलमान, आमिर? नसीरुद्दीन शाह यांनी सांगितलं कारण

अनुपम खेर यांनी व्हिडिओ शेअर करताना असे म्हटले आहे की, ‘कधीकधी तुम्हाला आसूंमधून हसावे लागते, दुखण्यातही हसावे लागते जेणकरुन दु:खामध्ये जगता येईल.’ यातील महिमा चौधरीचे फोटो कॅप्शन सार्थ करणारे आहेत. तिच्या डोळ्यांमध्ये अश्रू तर आहेत पण चेहऱ्यावर हसूही आहे. तिने यामध्ये काही फोटो विग घालून काढले आहेत. अनुपम खेर देखील तिच्या या प्रवासात तिची साथ देताना दिसत आहेत.

काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीच्या ब्रेस्ट कॅन्सरविषयी खुलासा करत बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर महिमाचा व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये महिमा असं म्हणते आहे की, कसे अनुपम खेर यांनी तिला एका प्रोजेक्टवर काम करण्यासाठी यूएसमधून बोलावले होते, त्यानंतर तिने अनुपम यांना तिच्या आजाराविषयी सांगितले. यादरम्यान महिमा बोलताना भावुक होते.

हे वाचा-या थ्रोबॅक फोटोतील मराठमोळ्या हिरोला ओळखलं का? हिंदीमध्येही आहे लोकप्रिय चेहरा

या व्हिडिओमध्येही महिमा सुरुवातीला हसत असते आणि त्यानंतर ती रडू लागते. अनुपम यांना तिला सिनेमात घेण्यासाठी वाट पाहावी लागेल असं ती त्यांना सांगते. अनुपम खेर यांनी महिमा चौधरी हिला ‘तू माझी हिरो आहेस’ असं म्हटलं आहे. तिच्या या वागण्याची अनेक महिलांना प्रेरण मिळेल असंही अनुपण खेर यांनी नमूद केलं होतं.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.