मुंबई : वाहिन्यांची, मालिकांची एकमेकांशी प्रचंड स्पर्धा सुरू असते. टीआरपी रेटिंगमध्ये आपलं स्थान बळकट करण्यासाठी मालिकांना काही ना काही शक्कल लढवाव्या लागतात. हल्ली मालिकांची लोकप्रियता वाढवण्यासाठी एक तासाचा एपिसोड दाखवला जातो. येत्या रविवारी तू तेव्हा तशी मालिकेचाही एक तासाचा भाग दाखवला जाणार आहे. त्यात एक नवं गाणं येणार आहे, जे आताच व्हायरल झालं आहे.

Photo:राजकुमार रावनं खरेदी केलं जान्हवी कपूरचं आलिशान अपार्टमेंट, किंमत ऐकून झोपच उडेल!

मालिकेत अनामिका आणि सौरभ यांची अव्यक्त प्रेम कथा प्रेक्षकांना भावली आहे.या दोघांचं प्रेम फुलत असताना नील आणि राधा यांचे प्रेमही सुरू झालं आहे. यातच आता मालिका एक नवीन वळण घेणार आहे. अनामिका सौरभ लग्न कधी करणार याकडे मालिकेच्या चाहत्यांचं लक्ष लागून राहिले असतानाच मालिकेत अचानकपणे आश्चर्यकारक घडामोडी घडताना दिसणार आहेत. रविवारच्या १ तासाच्या विशेष भागात एका सोहळ्यात खूप मजेदार गाणं प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.

शेअर केलेल्या पोस्टमध्ये “गोडाचं-धोडाचं करून घालूया नवीन पाहुण्याला, कशाला आता भांडण तंटा आनंदी राहूया.. ” हे शब्द लिहिले आहेत. यात मालिकेतील सर्व कलाकार नटून थटून या गाण्यावर ठेका धरताना पाहायला मिळणार आहे. धिंगाणा गोंधळ लग्नाआधीच ग, जाऊबाई नांदायला येणार घरात ग अशा या मजेदार गाण्याची शब्द रचना आणि सुमधुर संगीत कुणाल करण यांचं आहे. ठेकेदार गाणं कुणाल करण आणि सागरिका जोशी यांनी ठसक्यात गायलय. या गाण्याचं दिग्दर्शक महाबलेश्वर नार्वेकर यांनी केलं आहे. या गाण्याच चित्रीकरण नुकतंच झालं असून हे गाणं येत्या रविवारी १ तासाच्या विशेष भागात प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

आई कुठे काय करते : देशमुख कुटुंब चिंतेत, घरी येऊन काय म्हणाला अभी? Video झाला

मात्र मालिकेतला हा सोहळा नेमका कशासाठी हे अजूनही गुलदस्त्यात ठेवलेले पाहायला मिळत आहे. प्रेक्षक ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण म्हणजे अनामिका आणि सौरभचे लग्न. हा सोहळा त्यांच्या लग्नाचा तर नसेल ना? हे जाणून घेण्यासाठी महाएपिसोडची उत्सुकता वाढली आहे. या गाण्यासाठी वल्ली आणि अनामिका देखील एकत्र आल्या आहेत. सोबतच चंदू चिमणा चिमणीचीही जोडी गाण्यात झळकणार आहे. या विशेष भागात अनामिका आणि सौरभ प्रेक्षकांना एक सरप्राईज देणार आहेत. हे सरप्राईज काय असेल याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे.

जगात ९९ टक्के लोकांना पहिलं प्रेम मिळतच नाही- रवी जाधवSource link

Leave a Reply

Your email address will not be published.