नवी दिल्ली: संपूर्ण देशात आज ७४वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. आजच्या दिवशी सर्वात मोठे आकर्षण असते ते दिल्लीतील कर्तव्यपथावरील पथसंचलन होय. राष्ट्रपती, पंतप्रधान आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिक येत असतात.

प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या या कार्यक्रमात सर्व राज्य चित्ररथाच्या माध्यमातून आपली संस्कृती आणि परंपरा दाखवण्याचा प्रयत्न करत असतात. या वर्षा महाराष्ट्राने चित्ररथातून साडेतीन शक्तीपीठे आणि नारीशक्ती या संकल्पनेवर चित्ररथ सादर केला होता. या महाराष्ट्राच्या या चित्ररथाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

वाचा-महाराष्ट्राचा ५४ वर्षांपूर्वीचा चित्ररथ कसा होता, प्रजासत्ताक दिनाचे हे फोटो तुम्ही पाहिलेच नसतील

कर्तव्यपथावरील या पथसंचलनात १७ राज्ये आणि १० मंत्रालयांनी अशा २७ चित्ररथ सादर केले. महाराष्ट्राने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने साडेतीन शक्तीपीठे आणि नारीशक्ती या संकल्पनेवर चित्ररथ सादर केला. यात राज्यातील पुरातन मंदिरे आणि महिला कर्तुत्वाचे सादरीकरण करण्यात आले होते.

वाचा- पृथ्वी शॉपेक्षा धोकादायक आहे हा कोहली; फक्त गोलंदाजांची धुलाई नाही तर विकेट देखील घेतो

महाराष्ट्राच्या या चित्ररथात कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी, माहूरची रेणुकामाता ही तीन पूर्ण शक्तीपीठे तर वणीची सप्तश्रृंगी हे अर्ध शक्तिपीठ दाखवण्यात आले. या चित्ररथाच्या सर्वात पुढील बाजूस गोंधळी संबळ वाद्य वाजवताना दिसतो. त्याच्या दोन्ही बाजूस आराधी, गोंधळी वाद्य वाजवताना दिसतात. त्याच्या मागे शक्तिपीठांची मंदिरे असून त्यात देवींच्या प्रतिमा आहेत. मधळ्या भागात लोककलाकार आराधी, पोतराज हे दिसतात. तर सर्वात मागे नारी शक्तीची एक मोठी स्त्रीप्रतिमा दिसत आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *