मुंबई : प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) याच्या आगामी ‘जवान’ (Jawan) सिनेमाचा टीझर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. शाहरुखनं आतापर्यंत ज्या प्रकरारच्या भूमिका साकारल्या आहेत, त्यापेक्षा अगदी वेगळा अशी भूमिका तो जवान सिनेमात साकारत आहे. या सिनेमाच्या टिझरमध्ये शाहरुखचा लूक प्रेक्षकांना पाहायला मिळाला. त्याचा हा लूक प्रेक्षकांना भावला असून आता या सिनेमाची उत्सुकता त्यांना लागली आहे. दरम्यान, शाहरुखच्या जवान सिनेमाचा टिझर आणखी एका कारणानं खूपच चर्चेत आला आहे. हे कारण ऐकून पुणेकरांची कॉलर नक्कीच टाईट होणार आहे.


काय खास आहे टिझरमध्ये

शाहरुखच्या आगामी ‘जवान’ सिनेमाशी निगडीत एक व्हिडिओ पुणे (Pune) मेट्रोच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत शाहरुख पुण्यातील संत तुकाराम नगर या मेट्रो स्थानकावर बसलेला दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना एक पोस्ट लिहिली आहे. त्यात लिहिलं आहे की, ‘शाहरुख खानच्या आगामी सिनेमासाठी पुणे मेट्रोच्या संत तुकाराम नगर स्थानकाचीची झलक…’ पुणे मेट्रोच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केलेल्या या व्हिडिओला युझरनं भरभरून पसंती मिळाली आहे. ‘शाहरुखचा चित्रपट पुणे मेट्रोमध्ये चित्रित झाला आहे याचा आनंद आहे’, अशी कमेंट एका युजरनं केली आहे.


सोशल मीडियवर शाहरुखनं जवान सिनेमाचा टिझर शेअर केला होता. टिझर शेअर करुन शाहरुखने लिहिले होते, ‘२०२३ असणार अॅक्शन पॅक! २ जून २०२३ रोजी तुमचे मनोरंजन करण्यासाठी ‘जवान’ चित्रपट रिलीज होतो.’ १ मिनिट ३० सेकंदाच्या या टीझरमध्ये, शाहरुख त्याच्या डोक्यावर आणि हातावर पट्टी बांधलेला, हातात मशीन गन धरून एका गुप्त ठिकाणी बसलेला दिसत आहे. किंग खानचा हा लूक पाहून चाहतेही थक्क झालेत.

अक्षय कुमारचा सम्राट पृथ्वीराज पाहून प्रेक्षक म्हणाले….

Source link

Leave a Reply

Your email address will not be published.