मुंबई : मालिकांमध्ये आता सणवाराला सुरुवात झाली आहे. कांचनच्या आग्रहामुळेच देशमुखांच्या बंगल्यात मंगळागौर साजरी होतेय. अनघा आणि संजनाची मंगळागौर जोरदार सुरू आहे. सगळ्या जणी अगदी नटून थटून आल्यात. तर शेजारच्या रूममध्ये पुरुष मंडळीही बसून सगळं बघतही आहेत.

सध्या मालिकेच्या आगामी भागाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात कांचन अगोदर उखाणा घेताना दाखवली आहे. आजी उखाणा घेते, ‘झालं लग्न, झाल्या भेटीगाठी, विनायकरावांचं नाव असतं बारा महिने ओठी.’ तर इकडे आप्पांनाही उखाणा घ्यायचा आग्रह होतो. मग ते घेतात, ‘मनी वसे ते स्वप्नी दिसे, कांचनची भीती झोपेतसुद्धा असे.’

कुशल बद्रिकेला मित्रांनीच केली मारहाण, अभिनेत्याचा Video होतोय व्हायरल

त्यानंतर तिथे असलेली एक मावशी अरुंधतीला उखाणा घ्यायला सांगते. ते ऐकल्यावर इकडे नितीन लगेच म्हणतो, आशू तिथे अरुंधती उखाणा घेतेय. इथे तू घे. त्यावर आशू नितीनच्या अंगावर ओरडतो आणि बास म्हणतो. तिथे उपस्थित असलेले सगळे जण अवाक होऊन पाहायला लागतात. नितीन नेहमीच आशुतोषला अरुंधतीवरून चिडवत असतो. पण अवधानानं हे सगळ्यांसमोर झाल्यामुळे आशुतोष त्याच्यावर भडकतो.

देशमुखांच्या घरातला सगळा तणाव कमी व्हायला लागला आहे. यश मार्गावर येत असतानाच, घर साडून गेलेला अभिषेक घरी परत आला आहे. त्यानं आल्यावर यशची माफी मागितली. तुला उगाचंच बोललो, असंही म्हणाला. अनघाला दुखावल्याबद्दल तिचीही माफी मागितली. या व्हिडिओत यश आणि अभी एकमेकांशी बोलतायत. रात्रीची वेळ आहे. अनघाला काॅफी प्यायची इच्छा होते. तेव्हा अभी म्हणतो एवढ्या रात्री काॅफी पिऊ नकोस. दूध पी. मग यश लगेच अनघासाठी दूध आणायला खाली जातो. अभिषेकही आता आपण घर सोडून जाणार नाही, असा शब्द देतो.

दुसऱ्यांच्या सेक्स लाइफबद्दल विचारतोस, तुझ्या आईला चालतं? आमिरच्या प्रश्नावर काय

जगात ९९ टक्के लोकांना पहिलं प्रेम मिळतच नाही- रवी जाधवSource link

Leave a Reply

Your email address will not be published.