मुंबई : देशमुखांच्या बंगल्यात मंगळागौरीचा उत्साह ओसंडून वाहतोय. आई कुठे काय करते मालिकेत सध्या आनंदाचं वातावरण आहे. अनघा आणि संजनाची लग्नानंतरची पहिली मंगळागौर जोरदार सुरू आहे. अरुंधतीही तितकीच उत्साहानं भाग घेत आहे. गेल्या भागात संजना आणि अरुंधतीचा संवादही एकदम परिपक्व झाला. अरुंधतीनं संजनाला स्वत:कडचा दागिनाही दिला.

कोण आहे स्वप्निल जोशीची रखुमाई? हा Video अजिबात चुकवू नका!

सध्या एक व्हिडिओ व्हायरल झालाय. मंगळागौरीनिमित्त घरात शेजारणी जमल्या आहेत. त्यातली एक महिला म्हणते, काॅलेजमध्ये जाणंही आता कठीण होणार आहे. तर दुसरी म्हणते, या वयातल्या मुलींना इतकं स्वातंत्र्य देऊच नये. त्यावर अरुंधती बाकी एकदम चोख उत्तर देते. ती म्हणते, ‘१८-२० वर्षांच्या मुलींना काय घरात कोंडून ठेवणार? शाळा-काॅलेजमध्ये स्वसंरक्षण हा विषय शिकवला पाहिजे. तसं होत नसेल तर आपण शिकवायचं.’

अरुंधतीच्या या बोलण्यानं ईशाला एकदम हायसं वाटतं. आई आपल्या मागे उभी आहे, याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे. मालिकेत मंगळागौरीच्या खेळाचे बरेच भाग सुरू आहेत. त्यात आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात कांचन अगोदर उखाणा घेताना दाखवली आहे. आजी उखाणा घेते, ‘झालं लग्न, झाल्या भेटीगाठी, विनायकरावांचं नाव असतं बारा महिने ओठी.’ तर इकडे आप्पांनाही उखाणा घ्यायचा आग्रह होतो. मग ते घेतात, ‘मनी वसे ते स्वप्नी दिसे, कांचनची भीती झोपेतसुद्धा असे.’

नटरंगमध्ये काम मिळावं म्हणून चक्क संजय नार्वेकर गेलेला दिग्दर्शकाकडे

त्यानंतर तिथे असलेली एक मावशी अरुंधतीला उखाणा घ्यायला सांगते. ते ऐकल्यावर इकडे नितीन लगेच म्हणतो, आशू तिथे अरुंधती उखाणा घेतेय. इथे तू घे. त्यावर आशू नितीनच्या अंगावर ओरडतो आणि बास म्हणतो. तिथे उपस्थित असलेले सगळे जण अवाक होऊन पाहायला लागतात. नितीन नेहमीच आशुतोषला अरुंधतीवरून चिडवत असतो. पण अवधानानं हे सगळ्यांसमोर झाल्यामुळे आशुतोष त्याच्यावर भडकतो.

जगात ९९ टक्के लोकांना पहिलं प्रेम मिळतच नाही- रवी जाधवSource link

Leave a Reply

Your email address will not be published.