मुंबई : जून महिना म्हणजे शाळा-काॅलेजेस सुरू होण्याचा महिना. काॅलेजमध्ये जायला सगळ्यांनाच उत्साह असतो. अगदी तसाच आई कुठे काय करते मालिकेतल्या अरुंधतीलाही आहे. अनेक दिवस आपण पाहात होतो की अरुंधतीला आपलं राहिलेलं शिक्षण पूर्ण करायचं आहे. संसारात तिला काही ते जमलं नाही. पण आता तिनं काॅलेजमध्ये जाऊन प्राचार्यांची भेटही घेतली.

सध्या हा व्हिडिओ व्हायरल होतोय. यात प्राचार्या अरुंधतीला मिसेस देशमुख म्हणून संबोधतात. तेव्हा ती स्पष्टपणे सांगते की मी आता देशमुख नाही. जोगळेकर आहे. माझा घटस्फोट झाला आहे. खरं तर काॅलेजच्या प्रिन्सिपलनाही अरुंधती अॅडमिशन घेते, म्हटल्यावर आश्चर्य वाटतं. तेव्हा ती त्यांना सांगते, ‘लवकर लग्न झालं. त्यामुळे शिक्षण अर्धवट राहिलं. आता मला शिकायचंय. जमलं तर डिग्रीच्या पुढेही जायचं आहे. शिक्षण कधी वाया जात नाही.’

यावर प्राचार्या म्हणतात, ‘इच्छा चांगली आहे. पण आता बरीच गॅप पडली आहे. शिक्षण पद्धती बदलली आहे. जमेल का तुम्हाला?’ त्यावर अरुंधती म्हणते, प्रयत्न तर करते. शिवाय ती काॅरस्पाॅंडंट पद्धतीनं शिकायलाही नकार देते. ती म्हणते, समोरून ऐकलं की जास्त चांगलं कळेल असं वाटतंय.

आता पुढच्या काही भागांमध्ये आपल्याला अरुंधतीचं काॅलेज जीवन पाहायला मिळणार आहे. एकीकडे घरात रमणारी अरुंधती आकाशात झेप घेऊ पाहते. तर स्वत:ला माॅडर्न समजणारी संजना घरी व्रतवैकल्यात अडकणार आहे. येत्या भागात मालिकेत संजना वटपौर्णिमा करताना दिसणार आहे.


मालिकेत अजून वटपौर्णिमा दाखवायची आहे.अनघा पूजेचं तबक घेऊन वडाची पूजा करायला जाते. तशी संजना तिला थांबवून म्हणते, ‘अनघा ही साता जन्माची पूजा नीट कर अभीसाठी. आधी अंकिता होतीस, आता तू आहेस. म्हणून आपलं म्हटलं.’ असं म्हणून संजना अनघाच्या हातातलं पूजेचं तबक काढून स्वत:कडे घेते. त्यावर अनिरुद्धही गप्प बसत नाही. तो म्हणतो, ‘संजना तू ही पूजा करतेस. पण पुढचे सात महिनेही आपण एकत्र नसणार.’ यावर अरुंधती तिथे येऊन परखड बोल सुनावते.

प्रशांत दामले कायम स्टेजवरचा स्टारच होता | कविता मेढेकर

Source link

Leave a Reply

Your email address will not be published.