मुंबई : प्रसिद्ध कॉमेडी क्विन भारती सिंग कायम चर्चेत असते. व्यावसायिक असो वा व्यक्तिगत पातळीवर ती कायम चर्चेत असते. भारती जिथं जिथं जाते तिथं ती लोकांना खळखळून हसवते. काही दिवसांपूर्वी भारती आई झाली आणि ती इतर आईंप्रमाणेच तीही आपल्या लाडक्या लेकाची काळजी घेत आहे.

Video: सारा अली खानला पाहिल्यावर कार्तिकने मारली घट्ट मिठी

नुकतेच भारती आणि तिचा नवरा हर्ष लिंबाचिया तिच्या लेकाला, लक्ष्यला घेऊन डॉक्टरकडे गेले होते. तिथं गेल्यानंतर भारतीनं व्हिडिओ करायला सुरुवात केली. परंतु डॉक्टरांनी जेव्हा त्यांच्या लाडक्या लक्ष्यला घेतलं त्यानंतर जे काही झालं ते पाहून भारतीला रडू आवरता आलं नाही. तिनं तातडीनं व्हिडिओ शूट करणं बंद केलं.


भारतीनं हा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केल्यानंतर खूपच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये भारती सांगते की, त्यांचा मुलगा गोला अर्थात लक्ष्य (Laksh) याला डॉक्टर इंजेक्शन देताना दिसत आहे. ती डॉक्टरांना विनंती करते की, ती सगळ्यांना हसवते म्हणून तिच्या मुलाला प्लीज रडवू नका. त्यावर डॉक्टर तिला दिलासा देत म्हणतात की, तो थोडावेळ रडेल. परंतु माझी गॅरेंटी आहे की घरी जायच्या आधी तो नक्की रडायचा थांबेल.

भक्ताची योगयोगेश्वर जय शंकर मालिकेच्या सेटला भेट, शंकर महाराजांच्या सहवासात राहिले पेंटर काका


भारतीदेखील रडली

भारती तिच्या लेकाला इंजेक्शन देताना पाहू शकत नसल्यानं तिथून ती दूर जाऊन उभी राहिलेली दिसत आहे. भारती अतिशय अस्वस्थ दिसते. डॉक्टर तिच्या लेकाला इंजेक्शन देतात तेव्हा तो रडायला सुरूवात करतो. त्याचे रडणे ऐकून भारतीदेखील किंचाळते आणि रडायला सुरुवात करते. भारतीला तिच्या भावना आवरता न आल्यानं ती व्हिडिओ मध्येच बंद करते.


कामावर भारतीची आहे श्रद्धा

भारतीनं जेव्हा तिच्या मुलाला, गोलाला जन्म दिला त्यानंतर अवघ्या १२ व्या दिवशी ती कामावर परतली. ज्या निष्ठेने ती काम करते तितक्याच निष्ठेने किंबहुना त्याहून जास्तच काळजी ती मुलाची घेताना दिसते. सध्या भारती ‘खतरा खतरा खतरा’ कार्यक्रम करत आहे. भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांना ३ एप्रिल २०२२ रोजी मुलगा झाला. त्याचं नाव लक्ष्य असं ठेवलं. मात्र, प्रेमानं ते बाळाला गोला असं हाक मारतात.

हिरो हिरोईनच्यामध्ये व्हिलन बनून येऊ नकोस, राखीनं केली रितेशची तक्रार

Source link

Leave a Reply

Your email address will not be published.