मुंबई: अभिनेत्री ‘जान्हवी कपूर’ सोशल मीडियावर (Janhvi Kappor Instagram) ज्याप्रमाणे सक्रिय असते, त्याचप्रमाणे ती सोशल मीडियावर चर्चेत देखील असते. सेलिब्रिटी फोटोग्राफर्सकडून तिचे फोटोज आणि व्हिडिओज अनेकदा शेअर केले जातात. आता पुन्हा एकदा तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तिचा हा व्हिडिओ पाहून अभिनेत्रीने नेटकऱ्यांचं (Janhvi Kapoor Viral Video) मन जिंकलं आहे. अभिनेत्रीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. फॅनसह जान्हवीचं वागणं नेटिझन्सना आवडलं आहे.

हे वाचा-रोमँटिक सीन ते लिपलॉक, टीव्ही स्टार्सच्या Bold Scene ची झाली चांगलीच चर्चा

काय आहे व्हिडिओ?

सोशल मीडियावर सेलिब्रिटी फोटोग्राफरच्या पेजवरुन जान्हवी कपूरचा हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. ज्यामध्ये जान्हवी कपूर तिचा ब्लॅक ड्रेस फ्लाँट करताना दिसते आहे. यावेळी एक व्यक्ती तिच्याकडे फोटो काढण्याची विनंती करत असल्याचे दिसते. पण या व्यक्तीला जान्हवीसह फोटो काढायचा नाही आहे, तर ते त्यांच्या मुलीसाठी फोटो मागत आहेत. जान्हवीने त्यांच्या मुलीसह फोटो काढावा अशी विनंती ते करत आहेत. त्यांची विनंती ऐकून जान्हवी थांबते आणि त्या मुलीसह फोटोसाटी पोजही देते. अभिनेत्रीचा असा व्यवहार चाहत्यांना आवडला आहे.

हे वाचा-आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे’चं पोस्टर प्रदर्शित, अनेक भाषांमध्ये सिनेमा होणार रिलीज

‘ती खूप गोड आहे’, ‘So Adorable’, ‘ती खूप शांत आणि मृदू आहे’, अशा कमेंट चाहत्यांनी जान्हवीचं कौतुक करताना केल्या आहेत. जान्हवीने परिधान केलेल्या ब्लॅक ड्रेसचं देखील चाहते कौतुक करत आहेत.


जान्हवी कपूर हिने यावेळी साइल स्लिट असणारा काळ्या रंगाचा गाऊन परिधान केला होता. डीप नेकलाइन असणाऱ्या या ड्रेसचे जेवढे कौतुक झाले आहे, तेवढेच अभिनेत्रीला ट्रोल देखील व्हावे लागले आहे. ‘सर्व सेलिब्रिटी उर्फी जावेदला फॉलो करतायंत’, अशी कमेंट एका युजरने केली आहे. तर काही जण जान्हवीच्या फॅशन सेन्सचं तोंडभरुन कौतुक करत आहेत.


‘गुंजन सक्सेना: द कारगील गर्ल’मध्ये प्रेक्षकांची वाहवा मिळवणाऱ्या जान्हवी कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती लवकरच ‘मिस्टर अँड मिसेस माही’मध्ये राजकुमार रावसह स्क्रीन शेअर करणार आहे. दोस्ताना २ मध्ये देखील जान्हवी आहे. तिचा ‘बवाल’ हा सिनेमा पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे. जान्हवीच्या ‘गुडलक जेरी’ या प्रोजेक्टचे पहिले पोस्टर देखील अलीकडेच समोर आले आहे.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published.