सांगली : मिरज शहरातील शिवभोजन थाळी केंद्रावर नशेमध्ये असलेल्या दोघा तरुणांकडून राडा करण्यात आला आहे. केंद्रावर असणाऱ्या महिला कर्मचाऱ्यासोबत उद्धट वर्तन करत शिवीगाळ करण्यात आली आहे. तर दोघांना जेवण देण्यास नकार दिल्यामुळे त्यांनी तिथे असलेल्या फलक बोर्डला जोरात पाय मारून फाडला. दरम्यान, या नशेखोरांनी केलेल्या राड्याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.

मिरजेतील शिवभोजन थाळी केंद्रावर नशेखोर तरूणांचा राडा

मिरजेतील एसटी स्टँडजवळ असणाऱ्या शिवभोजन थाळी केंद्रामध्ये दोघं नशेखोर तरुणांकडून राडा करण्यात आला आहे. केंद्रामध्ये बसून जेवण करण्याची वेळ संपल्याने महिला कर्मचाऱ्याने संबंधीत नशेखोर तरुणांना बसून जेवण्यास नकार दिला. त्यानंतर दोघा तरुणांनी वाद घालण्यास सुरूवात केली. महिला कर्मचाऱ्याने पार्सल घेऊन जाण्यास सांगितलं. मात्र, बसून जेवण्यावर ठाम राहत जोराने वाद घालण्यास सुरवात करत शिवीगाळ सुरू केली.

महाविकास आघाडीला धक्का, देशमुख-मलिक राज्यसभा निवडणुकीत मतदानाला मुकणार
शिवभोजन केंद्रातील फलक बोर्ड पाडला

यातून एका नशेखोर तरुणाने लाथा घालून शिवभोजन केंद्रातील फलक बोर्ड पाडला. त्यानंतर महिला कर्मचाऱ्याशी अत्यंत उद्धट वर्तन करत शिविगाळ करत जेवण घेण्यास येणाऱ्या ग्राहकांना हाकलून लावले. तरुणांच्या राड्याचा हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला होता. हा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेची नोंद मिरज शहर पोलीसांकडे दाखल झाली आहे.

अनेक प्रश्नांची उत्तरं मिळणार! ‘रानबाजार’ सीरिजचे शेवटचे दोन भाग येणार या तारखेलाSource link

Leave a Reply

Your email address will not be published.