मुंबई : गोष्ट एका पैठणीची या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवल्यावर अभिनेत्री सायली संजीव जास्त चर्चेत आली. तिचे चाहते खूश झाले. सगळ्यांनाच हा सिनेमा थिएटरमध्ये पाहायचा आहे. पण सध्या एक गोष्ट सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. ते म्हणजे सायलीनं शेअर केलेलं रोमँटिक रील.

माझी तुझी रेशीमगाठ:नेहानं खडसावलं पहिल्या नवऱ्याला, अविनाशमुळे यश धोक्यात!

सायली संजीवनं नितीश चव्हाणसोबत सोशल मीडियावर एक गाणं शेअर केलंय. ते रील आहे. तुला पाहून याडं लागलं, असं म्हणत सायली कमालीची सुंदर दिसत आहे. काही दिवसांपूर्वी टिप्सनं सायली आणि नितीशवर एक गाणं आणलंय. हे गाणं युट्यूबवर हिट आहे. याच गाण्यावर सायलीनं इन्स्टाग्रामवर रील केलं.

सायलीला यावर खूप चांगल्या प्रतिक्रिया आल्यात. सगळ्यांनी तिला किती गोड दिसतेय, म्हणून लिहिलं आहे. सायली आणि नितीश दोघंही फार मोहक दिसतात.

मध्यंतरी सायलीनं अनन्या सिनेमा पाहून प्रतिक्रिया दिली होती. सायलीनं एक व्हिडिओ शेअर केला. चित्रपट पाहिल्यानंतर तिनं तिच्या भावना व्यक्त केल्यात. सर्वच कलाकाराचं तिनं कौतुक केलं आहे. तर हृताबद्दल बोलताना सायली भावुक झाली. तिच्या डोळ्यांत पाणी आलं. खूप काळानंतर मराठी सिनेसृष्टीला हृतासारखी अभिनेत्री मिळाली आहे, असं म्हणत सायलीनं हृताचं कौतुक केलं आहे.

शिकलेल्या महिलाही नवऱ्यासाठी उपास-तापास करतात तेव्हा…रत्ना पाठक

सिनेसष्टीत एखादी अभिनेत्री दुसऱ्या अभिनेत्रीचं भरभरून कौतुक करतेय, असं फार क्वचितच पाहायला मिळतं. सायलीनंही मनमोकळेपणानं हृताचं कौतुक केलंय. तिचा हा व्हिडिओ पाहून अनेकांनी सायलीचंही कौतुक केलं आहे.

गोष्ट एका पैठणीची सिनेमात एका मध्यमवर्गीय विवाहित महिलेच्या भूमिकेत सायली आहे. त्यामुळे तिच्या या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. ‘माझ्या अभिनयाच्या प्रवासातलं सगळ्यात सुंदर वळण म्हणजे ‘पैठणी’. ही ‘पैठणी’ मला मनापासून…कष्टाने विणायची आहे. त्यासाठी तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असू द्या, हीच विनंती..!.असं सायलीनं म्हटलं होतं.

जगात ९९ टक्के लोकांना पहिलं प्रेम मिळतच नाही- रवी जाधवSource link

Leave a Reply

Your email address will not be published.