मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाच्या दृष्टीने अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या दसरा मेळाव्याच्या (Dasra Melava) लढाईत ठाकरेंची सरशी झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी शिवसेनेच्या याचिकेवर केलेल्या सुनावणीअंती शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास ठाकरेंना हिरवा कंदील दाखवला. त्याचवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कॅबिनेट मंत्री संदिपान भुमरे (Sandipan Bhumare) यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत शिंदे भाषण करत असताना बाजूला भुमरे काही खाणाखुणा करताना दिसत आहेत.

शिवसेना प्रवक्त्या आणि पूर्व विदर्भ शिवसेना महिला संपर्क प्रमुख प्रा शिल्पा बोडखे यांनी हा नऊ सेकंदांचा व्हिडिओ ट्वीट केला आहे. व्हिडिओत संदिपान भुमरे यांच्या चेहऱ्याभोवती वर्तुळ करुन त्यांच्या चेहऱ्यावरील हावभावांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. भुमरे काय इशारा करत असतील…??? असा प्रश्न बोडखे यांनी विचारला आहे.

व्हिडिओत काय दिसतंय?

एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत बोलताना दिसत आहेत. त्यांच्या उजवीकडे मंत्री दीपक केसरकर बसले आहेत, तर डावीकडे मंत्री संदिपान भुमरे बसले आहेत. “किती तरी लोक केसमध्ये गेले, किती तर लोक मेले आंदोलनात, कुणावर एकतरी केस आहे का हो? या एकनाथ शिंदेवर शंभर” असं मुख्यमंत्री बोलत असल्याचं व्हिडिओत ऐकू येतं.

त्याच वेळी शेजारी बसलेले संदिपान भुमरे डोळ्यांनी कोणाला तरी खुणवताना दिसत आहेत. ती व्यक्ती कॅमेरात दिसत नाही. मात्र मध्येच भुमरे डोळ्यांनी एकनाथ शिंदेंकडे इशारा करताना दिसतात. ‘एकनाथ शिंदेंचं भाषण जोरदार सुरु आहे’ अशा आशयाचे त्यांचे हावभाव असल्याचं ट्विटराईट्सनी म्हटलं आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.