का भडकली कश्मिरा?

अभिनेत्री कश्मिरा शाह आपल्या बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोंमुळे कायमच चर्चेत असते. मात्र यावेळी ती कपिल शर्मावर केलेल्या आगपाखडीमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. द कपिल शर्मा शोच्या नव्या सीझनमध्ये कृष्णा का झळकणार नाही? हा प्रश्न विचारताच तिचा पारा चढला. हँपी बर्थ डे म्हणत तिने एकच गोंधळ घातला. दरम्यान कृष्णानं तिला रोखण्याचा प्रयत्न केला. पण रागाच्या भरात प्रश्न विचारणाऱ्यांचे माईकच तिने ढकलून दिले. कश्मिराचा हा अवतार पाहून सर्वच जण अवाक् झाले. खेळण्याची बंदूक दाखवून तरुणीने लुटली बँक, LIVE Video मधून दाखवलं चोरी कशी करतात?

कृष्णानं सांगीतलं कपिल शर्मा शो सोडण्याचं कारण

अखेर कृष्णानं कश्मिराला रोखलं आणि कपिल शर्मावर उत्तर दिलं. तो म्हणाला, “यापुढे आम्ही एकत्र काम करू. कपिल माझा चांगला मित्र आहे. पण यावेळी पैशांचं गणित जुळलं नाही. करारावरून आमचे मतभेद झाले. त्यामुळे मी काम करण्यास नकार दिला.” पण तो लवकरच एखाद्या विनोदी शोमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करेल असं आश्वासनं त्याने आपल्या चाहत्यांना दिलं आहे. या पार्श्वभूमीवर आता तो कुठल्या शोमध्ये झळकणार हे नक्कीच पाहण्याजोगे ठरेल.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.