दीपक पडकर, पुणे : भाजपचे दौंड विधानसभा मतदारसंघातील आमदार राहुल कुल (Rahul Kul) यांनी पत्नीला उचलून जेजुरी मंदिराच्या पायऱ्या चढल्या. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. सीतारामन जेजुरी मंदिरात दर्शनासाठी आल्या होत्या. त्यावेळी राहुल कुल यांनी पत्नी कांचन कुल (Kanchan Kul) यांना उचलून घेतले आणि मंदिराच्या पायऱ्या चढल्या. कांचन कुल यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर रिंगणात उतरुन बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना टफ फाईट दिली होती.

आमदार राहुल कुल यांनी पत्नी कांचन कुल यांना उचलत पाच पायऱ्या चढून जेजुरी मंदिरात प्रवेश केला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण जेजुरी मंदिरात दर्शनासाठी आल्या होत्या. त्यांच्या आगमनानंतर राहुल कुल यांनी आपली पत्नी कांचन कुल यांना उचलून पायऱ्या चढत मंदिरात प्रवेश केला. हे पाहून निर्मला सीतारमणही हरखून गेल्याचं बोललं जातं.

जेजुरीच्या मंदिरात लग्नानंतर पत्नीला उचलून पाच पायऱ्या चढण्याची प्रथा आहे. ती प्रथा कुल यांनी याही वेळी पार पाडली आहे. या अगोदरसुद्धा आमदार राहुल कुल यांनी जेजुरीला देवदर्शनसाठी आल्यानंतर पत्नीला उचलून पाच पायऱ्या चढल्या होत्या.

पाहा व्हिडिओ :

कोण आहेत राहुल कुल?

राहुल कुल हे पुण्यातील दौंड विधानसभा मतदारसंघातून भाजपचे आमदार आहेत. याआधी ते राष्ट्रीय समाज पक्षाकडून आमदार होते. मात्र २०१९ च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी त्यांनी भाजपात प्रवेश केला आणि तिकीट मिळवून निवडणूकही जिंकली.

कांचन कुल कोण आहेत?

राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात रिंगणात उतरवलं होतं. कुल यांनी सुळेंना टफ फाईट दिली होती. सुप्रिया सुळेंना ६,८६,७१४ मतं मिळाली होती, तर कुल यांना ५,३०,९४० मतं पडली होती.

हेही वाचा : मागच्या बोर्डची कल्पना नव्हती, मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीतून कारभाराचा आरोप, श्रीकांत शिंदेंची सारवासारव

अजित पवारांच्या नातेवाईक

बारामती तालुक्यातल्या वडगाव निंबाळकर येथील राजे निंबाळकर या घराण्याचं मोठं प्रस्थ आहे. हे कुटुंब उस्मानाबादच्या पाटील कुटुंबीयांशी संबंधित आहे. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार याही उस्मानाबादच्या पाटील कुटुंबातील सदस्य आहेत. वडगाव निंबाळकर येथील विजयसिंह उर्फ कुमारराजे निंबाळकर हे त्यांचे चुलत बंधू आहेत. तर कांचन कुल या विजयसिंहांच्या कन्या.

कांचन कुल यांनी बारामतीजवळच असलेल्या शारदानगर शैक्षणिक संकुलात आपलं पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलंय. कांचन यांच्या लग्नासाठी सुनेत्रा पवार यांनी पुढाकार घेत कुल कुटुंबीयांशी सोयरीक जुळवली होती.

हेही वाचा : मला गृहमंत्रिपद पाहिजे, साहेबांना किती वेळा म्हटलं पण नाहीच दिलं, अजितदादांची ‘मन की बात’Source link

Leave a Reply

Your email address will not be published.