मुलीला भेटण्यासाठी जळगाव ते कल्याण प्रवास करणाऱ्या व्यक्तीला मारहाण:गोमांस असल्याचा संशयावरून घडला प्रकार, VIDEO

मुलीला भेटण्यासाठी जळगाव ते कल्याण प्रवास करणाऱ्या व्यक्तीला मारहाण:गोमांस असल्याचा संशयावरून घडला प्रकार, VIDEO

जळगाव – मुंबई रेल्वे प्रवासादरम्यानचा एक व्हिडिओ आता समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये एक मुस्लिम व्यक्ती आपल्या हातामध्ये दोन प्लॅस्टिकच्या बरण्या घेऊन जाताना दिसत आहे. या बरण्यांमध्ये गोमांस असल्याचा आरोप काही सह प्रवाशांकडून करण्यात आला. त्यानंतर या व्यक्तीला मारहाण करण्यात आल्याचे या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. मात्र आता हा व्हिडिओ व्हायरल झाला असून याप्रकरणी गंभीर दखल घेऊन कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणात जळगाव जिल्ह्यातील एका गावातील हाजी अश्रफ मुन्यार हे आपल्या मुलीला भेटण्यासाठी कल्याणला रेल्वेने प्रवास करत होते. त्यावेळी इगतपुरीजवळ गोमांस बाळगल्याचा आरोप करत त्यांना शिवीगाळ करण्यात आली आणि त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. या प्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. लोकांमध्ये किती विष पसरले – इम्तियाज जलील यांचा प्रश्न हा व्हिडिओ पोस्ट करत एमआयएम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माजी खासदार इम्तियाज जलील यांनीही टीका केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले की, ‘आपण फक्त मूक प्रेक्षक बनून राहू शकत नाही. या शक्तींचा पराभव करण्यासाठी आपण सर्व धर्मनिरपेक्ष भारतीयांनी एकत्र येण्याची हीच वेळ आहे. या लोकांमध्ये किती विष पसरले आहे आणि कदाचित आपल्या आजोबांच्या वयाच्या एखाद्या व्यक्तीशी असे करण्याचा विचार ते कसे करू शकतात. निवेदने सादर करणे आणि सोशल मीडियावर आपला राग व्यक्त करणे पुरेसे आहे. सरकार आणि पोलिस डोळेझाक करत असतील तर समाज म्हणून आपण उभे राहून या शक्तींचा सामना केला पाहिजे. ही आता एक सामान्य गोष्ट झाली आहे आणि आम्ही भारतीय काहीही करत नाही. असे इम्तियाज जलील यांनी म्हटले आहे. ‘

​जळगाव – मुंबई रेल्वे प्रवासादरम्यानचा एक व्हिडिओ आता समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये एक मुस्लिम व्यक्ती आपल्या हातामध्ये दोन प्लॅस्टिकच्या बरण्या घेऊन जाताना दिसत आहे. या बरण्यांमध्ये गोमांस असल्याचा आरोप काही सह प्रवाशांकडून करण्यात आला. त्यानंतर या व्यक्तीला मारहाण करण्यात आल्याचे या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. मात्र आता हा व्हिडिओ व्हायरल झाला असून याप्रकरणी गंभीर दखल घेऊन कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणात जळगाव जिल्ह्यातील एका गावातील हाजी अश्रफ मुन्यार हे आपल्या मुलीला भेटण्यासाठी कल्याणला रेल्वेने प्रवास करत होते. त्यावेळी इगतपुरीजवळ गोमांस बाळगल्याचा आरोप करत त्यांना शिवीगाळ करण्यात आली आणि त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. या प्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. लोकांमध्ये किती विष पसरले – इम्तियाज जलील यांचा प्रश्न हा व्हिडिओ पोस्ट करत एमआयएम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माजी खासदार इम्तियाज जलील यांनीही टीका केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले की, ‘आपण फक्त मूक प्रेक्षक बनून राहू शकत नाही. या शक्तींचा पराभव करण्यासाठी आपण सर्व धर्मनिरपेक्ष भारतीयांनी एकत्र येण्याची हीच वेळ आहे. या लोकांमध्ये किती विष पसरले आहे आणि कदाचित आपल्या आजोबांच्या वयाच्या एखाद्या व्यक्तीशी असे करण्याचा विचार ते कसे करू शकतात. निवेदने सादर करणे आणि सोशल मीडियावर आपला राग व्यक्त करणे पुरेसे आहे. सरकार आणि पोलिस डोळेझाक करत असतील तर समाज म्हणून आपण उभे राहून या शक्तींचा सामना केला पाहिजे. ही आता एक सामान्य गोष्ट झाली आहे आणि आम्ही भारतीय काहीही करत नाही. असे इम्तियाज जलील यांनी म्हटले आहे. ‘  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment