नवी दिल्ली : भरातामधील वनडे वर्ल्ड कपमध्ये बांगलादेशची निराशाजनक कामगिरी झाली आणि त्यांना फक्त दोन सामने जिंकता आले. त्यानंतर जेव्हा बांगलादेशचा कर्णधार शकिब अल हसन मायदेशी परतला तेव्हा त्याला काही चाहत्यांनी मारहाण केली, असे म्हटले जात होत. शकिबला मारहाण केल्याचा व्हिडिओदेखील व्हायरल झाला आहे. यामध्ये शकिबला काही चाहत्यांनी चोप दिला आहे. पण हे नेमकं प्रकरण आहे तरी काय, हे आता समोर आले आहे. शकिबच्या नेतृत्वाखाली बांगलादेशची कामगिरी वाईट झाली होती. कारण बांगलादेशच्या संपूर्ण संघाला या वर्ल्ड कपमध्ये लय सापडली नाही. त्याचबरोबर शकिबचे श्रीलंकेच्या सामन्यात एक प्रकरणही घडले होते. शकिबने खेळ भावना न दाखवता श्रीलंकेचा कर्णधार अँजेलो मॅथ्यूजला टाइम आऊट पद्धनेतीने बाद केले होते. त्यामुळे शकिबवर वर्ल्ड कपमध्ये जोरदार टीका झाली होती. शकिब खेळभावना दाखवायला हवी होती, असे चाहत्यांचे म्हणणे होते. पण शकिबने ते केले नाही आणि त्यामुळेच तो जोरदार ट्रोल झाला होता. पण आता शकिबला मारहाण का केली आहे, ही गोष्ट समोर आली आहे.सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये शकिबच्या भोवती जमाव दिसत आहे आणि त्याला ओढत असल्याचे दिसत आहे. व्हिडीओमध्ये चाहते शकिबला अपशब्द वापरत असल्याचे दिसत आहे. व्हायरल व्हिडिओ शेअर करणाऱ्यांनी असा दावा केला आहे की, बांगलादेश संघ विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतर मायदेशी परतल्यावर क्रिकेट चाहत्यांनी शकिबला मारहणार करण्यात आली. पण ही गोष्ट तशी नाही. कारण शकिबला वर्ल्ड कपनंतर विमानतळावर पोहोचल्यावर ही मारहाण करण्यात आलेली नाही. दुबईमध्ये दागिन्यांच्या शोरूमचे उद्घाटन करताना शकिबला चाहत्यांनी मारहाण केली होती. त्यामुळे या व्हायरल व्हिडीओचा नुकत्याच झालेल्या विश्वचषक स्पर्धेशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दुबईत एका ज्वेलरी शोरूमचे उद्घाटन करताना शकिबला जमावाने मारहाण केल्याची आठ महिने जुनी घटना यात दाखवण्यात आली आहे.शकिबकडून या वर्ल्ड कपमध्ये चांगले नेतृत्व पाहायला मिळाले नाही. कारण बांगलादेशकडून मोठा अपेक्षा होत्या, पण त्यांनी अपेक्षाभंगच केला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *