ठाणे : ठाण्यातील मुंब्रा परिसरात असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएम (MIM) पक्षाच्या कार्यालयात काही अज्ञात गुंडांनी घुसून तलवार, चाकू आणि रॉडच्या सहाय्याने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात दोन जण गंभीर जखमी झाले असून हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

अज्ञातांकडून हा हल्ला एमआयएमचे कळवा मुंब्रा विधानसभा अध्यक्ष सैफ पठाण यांना दुखापत करण्यासाठी करण्यात आला होता. मात्र सैफ पठाण हे काही कामानिमित्त बाहेर गेले असल्याने आरोपींनी एमआयएम कार्यालयात हल्ला करून तेथे उपस्थित असलेल्या सैफ यांच्या दोन मित्रांना जखमी केले आहे. सुदैवाने या घटनेत कुणालाही गंभीर दुखापत झाली नसून कुठलीही जीवितहानी झालेली नाही.

मॉलमध्ये लवकरच वाइनविक्री सुरू होणार?; शिंदे गटाच्या आमदाराने दिले संकेत

या हल्ल्यात बिलाल काजी आणि फौज मान्सून या दोघांना दुखापत झाली आहे. स्थानिकांनी जखमींना रुग्णालयात दाखल केलं आहे. हल्ला केल्यानंतर अज्ञात आरोपींनी पोबारा केला. याप्रकरणी सैफ यांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात धाव घेत आपल्या कार्यालयात घडलेला सर्व प्रकार सांगून सीसीटीव्हीच्या आधारे तक्रार दाखल केली आहे. सैफ यांना याआधी देखील जीवे मारण्याच्या धमक्या अनेक वेळा आल्या होत्या. त्यानंतर त्यांनी आपल्याला धमकी देणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पोलीस प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला होता. मात्र गुरुवारी २२ सप्टेंबर रोजी रात्री ८ ते ९ वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे.

दरम्यान, या प्रकरणी पुढील तपास मुंब्रा पोलीस करणार आहेत.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.