मुंबई : अभिनेता कार्तिक आर्यन हल्ली रोजच चर्चेत असतो. तो जिथे जातो, तिथे गर्दी जमा होतेच. मुंबई विमानतळावर छोा फॅन रडू लागला, तेव्हा कार्तिक धावत त्याच्या जवळ गेला. कार्तिकचं वागणं लोकांची मनं जिंकून घेतं. नुकताच त्यानं जोधपूरहून मुंबईला येताना इकाॅनाॅमी क्लासमधून प्रवास केला. पण प्रेक्षकांना हे लक्षात आलंच. मग काय, आपल्या बरोबर कार्तिक आर्यन आहे म्हटल्यावर त्यांना आनंद होणारच.

प्रवाशांनी कार्तिक आर्यनचं विमानात जोरदार स्वागत केलं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कार्तिकही सगळ्यांना प्रेमानं भेटला. चाहत्यांबरोबर फोटोही काढले. लोकांनी कार्तिकबरोबर व्हिडिओही केले.

पत्नीच्या जाण्यातून सावरला नाही अभिनेता, एकट्यानेच सांभाळतोय मुलाला

सगळ्यांबरोबर शांत बसलेला कार्तिक आणि अचानक…
व्हिडिओत दिसतंय त्याप्रमाणे कार्तिक सुरुवातीला शांत बसला होता. कोणाला फारसं कळणार नाही, असं त्याला वाटलं. पण जेव्हा लोकांना कळलं की विमानात कार्तिक आहे, मग काय विचारता! सगळे मागे वळून पाहू लागले. अभिनेत्यानंही सीटवरून उठून सगळ्यांशी हस्तांदोलन केलं. अभिनेत्याचं हे वागणं सहप्रवाशांना खूप आवडलं. ते कमालीचे खूश झाले. त्याचं कौतुक करू लागले. ‘भूलभुलैया २’ सिनेमाच्या प्रमोशन वेळीही कार्तिकनं विमानातून इकाॅनाॅमी क्लासमधून प्रवास केला आहे.

एकत्र दिसले सारा आणि कार्तिक
मुंबईमध्ये ओटीटी प्ले अवॉर्ड २०२२ कार्यक्रम हा सोहळा पार पडला. या सोहळ्यातील काही फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामध्ये एका व्हिडिओवर सर्वांच्या नजरा खिळल्या आणि तो सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला. त्या व्हिडिओमध्ये सैफ अली खानची मुलगी सारा अली खान आणि अभिनेता कार्तिक आर्यन दिसत आहेत.या व्हिडओमध्ये सारा आणि कार्तिक एकत्र बसलेले दिसत असून एकमेकांशी हसून खेळून बोलताना दिसत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दोघांचे चाहते खूपच आनंदित झाले आहेत. या क्षणाची ते अनेक दिवसांपासून वाट बघत होते.

इथल्या गवताला आमच्या बालपणाचा वास येतो, कुशल बद्रिके रमला अमूल्य आठवणींत!

मुंबई एयरपोर्टवरील शमिताच्या पांढऱ्या शुभ्र कॅज्युअल लूकची चाहत्यांना भुरळSource link

Leave a Reply

Your email address will not be published.