नागपूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभा सदस्य विजय वडेट्टीवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना विरोध केल्याने ही धमकी देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. यासंदर्भात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. वडेट्टीवार यांनी सुरक्षा वाढवण्याची मागणी केली आहे.

राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना मराठा आंदोलकांकडून जीवे मारण्याच्या धमक्यांचे संदेश येऊ लागले आहे. मराठ्यांना थेट कुणबी प्रमाणपत्र देऊ नये, या मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेला काही दिवसांपूर्वी त्यांनी विरोध दर्शवला होता. त्यानंतर मराठा समाजातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. त्यामुळे संपूर्ण राज्यातून त्यांना धमकीचे संदेश येत आहेत. याबाबत वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्राद्वारे माहिती दिली आहे.

बीडमधील पोलीस अधिकारी जातीयवादी, मराठा आंदोलकांवर नाहक गुन्हे; मनोज जरांगेंचा सरकारला निर्वाणीचा इशारा

वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुरक्षा वाढवण्याची विनंती केली आहे. सध्या विरोधी पक्षनेते म्हणून वडेट्टीवार यांना वाय प्लस सुरक्षा आहे. मराठा समाजाका मिळत असल्याचे पाहता ही सुरक्षा अपुरी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात अधिक सुरक्षेची मागणी केली आहे. त्यामुळे राज्य सरकार या मागणीकडे कसे पाहते, हे महत्त्वाचे ठरणार आहे.

राहुल गांधींनी तुम्हाला हेच शिकवलं का? भुजबळांवर बरसणारे जरांगे पाटील वडेट्टीवारांवर बरसले

2017-18 मध्ये मराठा समाजाने मूक मोर्चे काढून आरक्षणाची मागणी केली. त्यावेळी विजय वडेट्टीवार यांनाही धमकी देण्यात आली. आता विजय वडेट्टीवार यांनी ओबीसी समाजावरील अन्याय थांबविण्यासाठी कठोर भूमिका घेतली आहे. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊ नये, असे त्यांचे म्हणणे आहे.वडेट्टीवार यांनीही मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताच मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी वडेट्टीवार यांना धमक्या देण्यास सुरुवात केली. वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवल्यानंतर आता त्यांची सुरक्षा वाढवण्याची जबाबदारी सरकारवर येणार आहे. त्यामुळे आता गृहखाते काय भूमिका घेणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

कबड्डी खेळल्यासारखे नंबर लावून बारी बारीने येतायत; मनोज जरांगेंचा भुजबळ, वडेट्टीवारांवर निशाणाSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *