नागपूर: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी२० मालिकेचा दूसरा सामना आज नागपूरमध्ये खेळवला गेला आणि या सामन्यात भारताने ६ गाडी राखून ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवला. पावसाच्या सावटामुळे आजचा सामना होणार की नाही अशी चिन्हे होती. त्याचसोबत पावसामुळे फील्ड ओली झाल्याने जोपर्यंत खेळण्यासाठी मैदान पुर्णपणे तयार झाले नसल्याने आजचा सामना खूप उशिरा सुरू करण्यात आला. त्यामुळे आजचा सामना २० ऐवजी ८ षटकांचा सामना खेळवला गेला. २-३ वेळेस मैदानाचे परीक्षण केल्यानंतर पंचांनी सामना सुरू करण्यासाठी हिरवा कंदील दिला.

आजच्या सामन्यात भारताच्या फलंदाजी आणि गोलंदाजी बाजूने उत्कृष्ट कामगिरी केली. भारताचा कर्णधार रोहित शर्मा याच्या दमदार खेळीमुळे भारतीय संघाला आजचा विजय मिळवता आला. ऑस्ट्रेलियाच्या सर्वच गोलंदाजांची धुलाई करत चौकार आणि षटकार ठोकत २३० च्या स्ट्राइक रेटने २० चेंडूत ४६ धावा अशी अफलातून खेळी केली. हिटमॅनच्या या खेळीमुळे आज भारतीय संघाने विजय मिळवत या मालिकेत १-१ अशी बरोबरी केली. आजच्या सामन्यात सोबतीचे सर्वच फलंदाज झटपट आऊट झाले, पण रोहित एकटाच श्वेतपर्यंत मैदानात दटून उभा होता आणि भारताला एकहाती विजय मिळवून देण्यात सफल ठरला. या दमदार खेळीसहित रोहित शर्माने आपल्या नावे एक मोठा विश्वविक्रम केला आहे.
सचिन नाही तर या क्रिकेटपटूच्या वडिलांकडून बॅटिंगचे धडे घेतोय अर्जून तेंडुलकर, PHOTO पा

हिटमॅन अव्वल स्थानवर

भारताचा कर्णधार यंदाच्या मोसमात छान फलंदाजी करत आहे. त्याने १७ लढतींमध्ये २६.४३ची सरासरी आणि १४३.३८च्या स्ट्राइक रेटने ४२३ धावा तडकावल्या आहेत. या १७ लढतींमध्ये रोहितने २१ षटकारांची आतषबाजीही केली आहे. भारताचा कर्णधार आणि सलामीवीर रोहित शर्माला टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार खेचण्याचा विक्रम खुणावत होता आणि आजच्या या सामन्यात त्याने हा विक्रम पूर्ण केला आहे. रोहित शर्मा हा टी-२० इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार खेचणारा खेळाडू ठरला आहे. २००७-२०२२ या कालावधीत १३८ सामन्यांमध्ये सर्वाधिक १७६ षटकरांसह रोहित शर्मा अव्वल स्थानावर पोहोचला आहे. आज ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-२०द्वारे मिळालेल्या संधीत रोहितने मार्टिन गप्टीलचा विक्रम मोडत हा विक्रम नोंदवला. मार्टिन गप्टील १७२ षटकारांसह दुसर्‍या क्रमांकावर गेला असून, ख्रिस गेल १२४ षटकारांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

रवींद्र जडेला संघात घेण्यासाठी दिल्लीची फिल्डिंग, CSK च्या निर्णयाने सर्वांनाच बसला धक्का

टी-२० इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार लगावणारे खेळाडू
रोहित शर्मा -१३८ सामने- १७६ षटकार
मार्टिन गप्टिल – १२१ सामने-१७२ षटकार
ख्रिस गेल – ७९ सामने – १२४ षटकार
इयॉन मॉर्गन – ११५ सामने – १२० षटकार
एरोन फिंच – ९४ सामने – ११९ षटकारSource link

Leave a Reply

Your email address will not be published.