विजयात लाडक्या बहिणींचा वाटा खूप मोठा:माझ्या मतदारसंघात जरांगेंचा परिणाम निश्चितपणे झाला, परंतु इतर मायनॉरिटीजने तारले – छगन भुजबळ

विजयात लाडक्या बहिणींचा वाटा खूप मोठा:माझ्या मतदारसंघात जरांगेंचा परिणाम निश्चितपणे झाला, परंतु इतर मायनॉरिटीजने तारले – छगन भुजबळ

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी महायुतीच्या विजयावर प्रतिक्रिया दिली आहे. तसेच लाडक्या बहीणींचा या विजयात मोठा वाटा असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. मनोज जरांगेंचा परिणाम केवल माझ्या मतदारसंघात मला पाहायला मिळाला आणि त्याचा परिणाम देखील झाला असल्याचे भुजबळ म्हणाले आहेत. छगन भुजबळ म्हणाले, लोकसभेच्या निवडणुकीनंतर जे नैराश्य आले होते ते नैराश्य दूर करण्यामध्ये देवेंद्र फडणवीस, अजित पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या सर्व सहकाऱ्यांना घेऊन प्रचंड मेहनत घेतली आहे. विशेषतः अजित पवार सकाळी 6 वाजता बाहेर पडायचे आणि रात्री उशिरा यायचे. सगळ्यांनीच खूप मेहनत घेतली. लोकांमधील संभ्रम दूर केला आणि या सगळ्यात लाडक्या बहिणीचा वाटा खूप मोठा आहे. वेळेवर सगळ्या बहिणींना पैसे मिळतील याचे नियोजन अजित पवारांच्या खात्याने केले. त्यामुळे सर्वांना खात्री पटली की हे सरकार जे बोलत आहे ते करत आहे. त्यामुळे जनतेने आपल्यावर विश्वास दाखवला, असे छगन भुजबळ म्हणाले. शरद पवारांबद्दल बोलताना छगन भुजबळ म्हणाले, शरद पवारांनी माझ्या मतदारसंघात सभा घेतली तसेच माझ्या विरोधात कोणता उमेदवार द्यायचा याचा सगळ्याचा त्यांनी व्यवस्थित अभ्यास केला होता. त्याप्रमाणे त्यांनी निर्णय घेतले. पण आमचे मित्र जरांगे त्यांचे काय काम होते? त्यांनी तर सांगितले होते की मी या निवडणुकीत पडणार नाही, पाडणार नाही, बोलणार नाही, माझा कोणाला पाठिंबा नाही, माझा कोणाला विरोध नाही. पण प्रचार संपण्याच्या आदल्या दिवशी सकाळी 10 वाजल्यापासून रात्री 2 वाजेपर्यंत हाताला सलाईन आणि मी पाहा, मी आजारी आहे, माझे काहीही आता होईल, मी समाजासाठी मरतोय, यांनी विरोध केला आणि यांना पाडा. परंतु माझ्या मतदारसंघात त्याचा परिणाम निश्चितपणे झाला, माझ्या मताधिक्यावर त्याचा परिणाम झाला. परंतु, ते जेवढे झाले तेवढेच इतर जे मायनॉरिटीज आहेत, अगदी हिंदू असतील, मुस्लिम असतील, आदिवासी, ओबीसी सगळे एकवटले आणि त्यांनी आमचे तारू जे आहे ते किनाऱ्याला लावले. आम्ही फक्त आमचा नेता विधिमंडळाचा अजितदादा पवार यांची सर्वानुमते नेमणूक केली आहे. आता शिंदे यांचे नेतेपदी कोण आहे, भाजपचे नेतेपदी कोण आहे ते अजून कळायचे आहे. परंतु आमचा देवेंद्र फडणवीस यांना विरोध असण्याचा काही कारण असेल असे मला तरी वाटत नाही.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment